दोडामार्ग: तालुक्यातील मांगेली येथील प्रशासनाचं लक्ष वेधून सुद्धा काळ्या दगडाच्या खाणी सुरू करण्यासाठी महसूल विभागांने जास्त प्रयत्न केले. दिवसातून सहा वेळा सुरुंग स्फोटाचे धमाके हे मांगेली ग्रामस्थांना ऐकावे लागतात. मांगेली येथे दोन ऐवजी तीन कोऱ्या (दगडाची खाण ) कार्यरत करण्यासाठी महसूल विभागाचा जबाबदार आहे. एक मासापूर्वी मांगेली ग्रामस्थांनी मांगेलीचे माळीन किंवा ईर्षालवाडी करू नका. असे निवेदन येथील तहसीलदार तआणि जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवले होते. तसेच काही ठिकाणी डोंगरांना भेगा पडल्याचे सुद्धा निदर्शनास आणून दिले होते. मात्र जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यापर्यंत मांगेली ग्रामस्थांनी लक्षवेधून सुद्धा एकापेक्षा तीन कोऱ्या सुरू करण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले. व मांगेली ग्रामस्थांच्या वतीने दिलेल्या निवेदनास केराची टोपली दाखवली.
जर डोंगरांना भेगा पडल्या असतील तर आपण गाव सोडा मात्र कोणत्याही परिस्थितीत काळ्या दगडाच्या खाणी बंद होऊ देणार नाही ही महसूल विभागाने महत्त्वाची भूमिका घेतली.
जर महसूल विभागाचा असा हट्ट असेल तर मांगेलीची इरशाळवाडी आणि माळीन होऊ देणार नाही. हा सुद्धा हट्ट आमचा आहे. येत्या आठ दिवसात जर यावर कारवाई न झाल्यास दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर वेळ व दिनांक ठरवून आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असे यावेळी मांगेली ग्रामस्थांनी सांगितले.