Home Uncategorized दोडामार्ग तालक्यातील साटेली-भेडशी येथे आरोग्य केंद्र नूतन इमारत लोकार्पण सोहळा…

दोडामार्ग तालक्यातील साटेली-भेडशी येथे आरोग्य केंद्र नूतन इमारत लोकार्पण सोहळा…

111

दोडामार्ग : लोकार्पण कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थिती नसली तरी दोडामार्ग तालुक्यावर आपले लक्ष असून येथील विकास कामासाठी भरघोस असा निधी आणलेला आहे. याचे भूमिपूजन, उद्घाटन यापेक्षाही या निधीतून विकासकामे मार्गी लागत आहे. याचे समाधान आहे. यापुढेही जास्तीत जास्त निधी आणून तालुक्याचा विकास साधणार, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली. शालेय मंत्री दिपक केसरकर हे दोडामार्ग तालुक्यातील साटेली – भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ऑनलाईन दृश्यप्रणालीवर बोलत होते. त्यांनी ऑनलाईनद्वारे या आरोग्य केंद्राचे लोकार्पण झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर दिपक केसरकर म्हणाले , साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत होण्यासाठी आपण प्रयत्न करून तत्कालीन माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी विशेष मेहनत घेऊन खास बाब म्हणून त्यांनी केंद्रीय स्तरावर निधीसाठी प्रयत्न केल्याने या आरोग्य केंद्राच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. पुढील काही दिवसांत अधिवेशन सुरू होत असल्याने या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही. या इमारतीच्या व आरोग्य केंद्रातील इतर आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, तसेच दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम येत्या चार दिवसात सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धुरी, तहसीलदार अरुण खानोलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर , वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन डॉ. तुषार चिपळूणकर, डॉ. राणे, शिवसेना तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, सारंग, इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, जिल्हा, तालुक्यातील महत्वाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर साटेली मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी वर्ग, या आरोग्य केंद्रांतर्गत येणारे उपकेंद्रातील डॉक्टर, आरोग्य सेवक, आरोग्यसेविका, आशा, परिसरातील गावातील सरपंच , उपसरपंच, ग्रामस्थ, आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस म्हणाले, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे दोडामार्ग तालुक्यावर प्रेम असल्याने त्यांनी तालुक्यासाठी भरघोस निधी देत विकासाची गंगा आणली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाममंत्री असल्याने या खात्याच्या संबंधित तालुक्यातील विविध कामांना अजून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार याबाबत तीळमात्र शंका नाही. लोकार्पण कार्यक्रमानंतर उपस्थित लोकप्रतिनिधी, मान्यवर यांना नूतन आरोग्य केंद्राच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी इमारतीची कक्षनिहाय पाहणी दरम्यान माहिती दिली . तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, सहकारी कर्मचारी यांना शुभेच्छा देत यापुढे रुग्णांना व चांगली आरोग्य सेवा मिळावी, व सर्वसामान्यांच्या आरोग्याची चांगली सोय निर्माण करावी, अशी अपेक्षा शिवसेना तालुकाप्रमुख गणेशासाद गवस व ठाकरे गट शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी व्यक्त केली. लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी शिवसेना व ठाकरे शिवसेना पदाधिकारी एकत्रित नूतन आरोग्य केंद्राचे लोकार्पण व्हावे, यासाठी ठाकरे शिवसेना पदाधिकारी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी स्वतः लोकार्पणही केले. पुढे प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी आंदोलनही केले, असे असले तरी रविवारच्या लोकार्पण कार्यक्रमात दोन्ही गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . आरोग्य केंद्राच्या पायऱ्यांवर दोन्ही गटांनी एकमेकांना शुभेच्छा देत एकत्रित फोटोसेशनही केले.