दोडामार्ग प्रतिनिधी: दोडामार्ग तालुक्यातील अडाळी – खालची वाडी येथील १३ वर्षे वय असलेल्या कु. वंशीका विष्णु सावंत हिचे आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे तातडीने यकृत प्रत्यारोपणाची Liver Transplant गरज निर्माण झाली आहे. सध्या ती गोवा येथील बांभूळी येथील रुग्णालयात असून यकृत प्रत्यारोपण तसेच पुढील उपचारासाठी बंगलोर किंवा मुंबई येथे जावे लागणार आहे.
पुढील उपचार अत्यंत खर्चिक असून घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. तिचे आई वडील शेतीवर आपला उदरनिर्वाह करत आहेत. नातेवाईकांनी केलेली मदत आतापर्यंतच्या उपचारासाठी खर्ची झाली असूनत्यामुळे पुढील उपचारासाठी पैसे कसे उभे करावे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. त्यामुळे त्यांनी मुलीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी जमेल तेवढी मदत करावी असे आवाहन केले आहे.
मदत करण्यासाठी Gpay नंबर – 7588862507
(उदय कोठावळे, मुलीचा मामा)
संपर्क-7588209887 (आरती विष्णू सावंत- मुलीची आई)
Patient name-Vanshika Sawant.
Hospital name-GOA MEDICAL COLLEGE BAMBOLIM-GOA
Bed-05, Ward number -PICU-134