Home राजकारण देशाला मोदी साहेब आणि कोकणाला राणे साहेब यांची अत्यंतगरज…! बाळा गोसावी

देशाला मोदी साहेब आणि कोकणाला राणे साहेब यांची अत्यंतगरज…! बाळा गोसावी

160

भटक्या विमुक्त आघाडीची खारेपाटण येथे प्रचार फेरी.

 

मसुरे प्रतिनिधी: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा -भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी, मनसे, रिपब्लिकन पक्ष,राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या प्रचारादरम्यान खारेपाटण येथे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संजय आग्रे, भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी भाजपा भटके विमुक्त आघाडी श्री नवलराज काळे व पदाधिकारी यांनी प्रचार फेरी पूर्ण केली. यावेळी बोलताना बाळा गोसावी म्हणालेत देशाला नरेंद्र मोदी आणि कोकणाला नारायण राणे यांची आवश्यकता असून येथील विकास हा भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि इतर सर्व मित्र पक्षाच्या माध्यमातूनच होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयात भटक्या विमुक्त आघाडीचा मोठा वाटा राहणार आहे.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष व सर्व मित्र पक्ष हे नारायण राणे यांच्या विजयासाठी जोमाने प्रयत्न करत असून खारेपाटण विभागातूनही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यात शिवसेनेचा मोठा हात असेल असे प्रतिपादन या पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.