४ ऑक्टोबर वार्ता: देहलीतून अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या ३ आतंकवाद्यांनी मंदिरे, मजार (मुसलमानाचे थडगे) यांसह मुंबई, सुरत, वडोदरा, गांधीनगर आणि कर्णावती येथील राजकीय नेत्यांची ठिकाणे आदी एकूण १८ ठिकाणी रासायनिक बाँबस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता, अशी माहिती उघड झाली आहे. यासाठी त्यांनी काही भागांचे निरीक्षणही केले होते.या आतंकवाद्यांनी घातपात करण्यासाठी नवीन तरुण शोधण्यासाठी पुणे, बेंगळुरू आदी ठिकाणांहून मुसलमान तरुणांचा बुद्धीभेद करून त्यांना जाळ्यात ओढण्याचे काम चालू केले होते. अशा तरुणांना रासायनिक बाँब कसे बनवायचे ? आणि कट यशस्वी कसा करायचा ?, यांचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक ठिकाणी तळ उभारले होते. यांपैकी एक तळ गोव्यातही होता.
देशातील काही राज्यांत होते तळ !
गोव्यासह लवासा (पुणे), महाबळेश्वर (सातारा), हुबळी आणि उडुपी (कर्नाटक) तसेच केरळमधील वलसाड वन्यजीव अभयारण्य, नल्लामला पर्वत रांगा आणि चांदौली येथे तळ उभारण्यासाठी या आतंकवाद्यांनी जागा शोधून तेथे तळ उभारले होते.
शाहनवाजने हिंदु तरुणीशी विवाह करून तिचे धर्मांतर करत तिला बनवले आतंकवादी !
अटक करण्यात आलेल्या ३ आतंकवाद्यांपैकी एक असणार्या शाहनवाज याने गुजरातमधील एका हिंदु तरुणीशी विवाह करून तिचे धर्मांतर केले होते. शाहनवाज याने पत्नीचाही बुद्धीभेद करून तिला आतंकवादी बनवले होते. तीही या त्यांच्या कटात सहभागी होती. सध्या ती पसार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. शाहनवाज बाँब बनवण्यात सराईत होता. तो झारखंडमधील हजारीबाग येथील रहिवासी आहे.