सावंतवाडी प्रतिनिधी: परिचारिक यांनी जेष्ठ नागरिकांची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी, त्यांचे योग्य संगोपन करावे, ज्येष्ठ नागरिक यांची सेवा फार महत्त्वाची आहे, ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारचे सहकार्य आणि त्यांच्या आरोग्याची योग्य निगा परिचारिका यांनी करायला हवी यासाठी सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज येथे मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभाग अंतर्गत ज्येष्ठ नागरिक संगोपन परिचारिका प्रशिक्षण अभिनव कार्यक्रम घेण्यात आला. या कॉलेजमध्ये युवा परिवर्तन स्किल इंडिया यांच्यातर्फे नर्सिंग असिस्टंट कोर्स सुरू करण्यात आला आहे. या नर्सिंग असिस्टंट मधील परिचारिकांना जेष्ठ नागरिकांचे संगोपन कसे करायचे? याबाबतचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे दीप प्रज्वल करून उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे संचालक डॉ. कुणाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे डॉक्टर सचिन राऊत, एसएनडीटी विद्यापीठाचे शुभम सोनवणे, युवा परिवर्तन चे रिजनल मॅनेजर डी. व्ही. परुळेकर, लोकमान्य ट्रस्टचे एक्झिक्यूटिव्ह डॉक्टर महेश सातवसे, प्राचार्य यशोधन गवस, हळवे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, तरुण भारतचे प्रतिनिधी तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ॲड. संतोष सावंत, एल. पी. पाटील, सौ वैष्णवी गोवेकर, सौ. प्रांजल राऊळ आधी उपस्थित होते.
यावेळी श्री जाधव पुढे म्हणाले मुंबई विद्यापीठा अंतर्गत आता पुढील वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शिक्षणाबरोबर अन्य विविध व्यावसायिक अभ्यासक्रम स्किल डेव्हलपमेंट च्या दृष्टीने वाव आहे. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक संगोपन कसे करता येईल? तसेच त्यांना बँकिंग बाबतची माहिती आधी अभिनय उपक्रम विद्यापीठ अंतर्गत सुरू करण्यात आले आहेत. देशभक्त शंकराव गवाणकर कॉलेजने नर्सिंग असिस्टंट स्किल डेव्हलपमेंट हा कोर्स सुरू केला आहे. असे कोर्स कोकण विभागात सर्वत्र जिल्ह्यात सुरू केले जाणार आहेत. असेही ते म्हणाले.
यावेळी डी. व्ही. परुळेकर यांनी नर्सिंग असिस्टंट कोर्स घेतलेल्या मुलाने एक विश्वास पूर्व असे काम केले पाहिजे लं. आत्मविश्वासाने तुम्ही या सर्व बाबीकडे सामोरे जा. असे स्पष्ट केले. यावेळी प्राचार्य यशोधन गवस यांनी या कॉलेजच्या मार्फत येत्या काळात इलेक्ट्रिशन, मेहंदी प्रशिक्षण, ब्युटी पार्लर अधिक कोर्स शिकवले जाणार आहेत. हे तीन ते सहा महिन्याचे कोर्स असणार आहेत. ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी 9420821899 या नंबर वर संपर्क साधावा. नर्सिंग असिस्टंट डेव्हलपमेंट कोर्सच्या मार्फत जवळपास ग्रामीण भागातील मुली याचा लाभ घेत आहेत. असे ते म्हणाले.
यावेळी ॲड. संतोष सावंत व डॉक्टर सुभाष सावंत म्हणाले आता परिचारिकांना खूप वाव आहे. घराघरात ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी आता परिचारिका ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही एक विश्वास पूर्ण रुग्णांचे योग्य संगोपन करायला हवे. खरंतर ज्येष्ठ नागरिक यांना विश्वास वाटायला हवा की ही परचारी का आपली माता आहे. आपली भगिनी आहे आणि तुमचा विश्वास आणि नातं घट्ट झालं पाहिजे. तुम्ही या कॉलेजमध्ये शिकत आहात. निश्चितपणे त्या काळात तुम्ही दर्जेदार असे काम करा. असे स्पष्ट केले.
यावेळी सूत्रसंचालन साईनाथ पंडित व आभार सरोली पेडणेकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने परचारी का व विद्यार्थी उपस्थित होते.