Home स्टोरी देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत बघुयात….! मनोज जरांगे पाटलांनी

देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत बघुयात….! मनोज जरांगे पाटलांनी

167

१० डिसेंबर वार्ता: मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. “देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांना सांगितलं असेल की बोल म्हणून.” कारण, लोंडा की फोंडा कोण आहे तो वळवळ करतोय. हे फडणवीसांनीच सुरू करायला लावलं आहे. ते त्यांच्या जवळचे आहेत. हे देवेंद्र फडणवीसांच्या ताटात जेवतात. मराठा समाजाशी तुमचा सामना आहे. असं मनोज जरांगे पाटल म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत बघुयात, मराठा बघतोय. असं तुमच्या डोक्यात काही विषारी विचार असेल तर मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका. त्यांच्या माध्यमातून मराठ्यांत कलह लावू नका”, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला.