Home राजकारण देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नंतर आधी कार्यकर्ता….चंद्रशेखर बावनकुळे

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नंतर आधी कार्यकर्ता….चंद्रशेखर बावनकुळे

59

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत प्रचाराला यावं लागतंय. याबाबत काही प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले होते. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?….देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्ता आहेत. उपमुख्यमंत्री नंतर आहेत. त्यामुळे ते पुण्यात प्रचाराला आले असतील तर त्यात काही विशेष नाही. इतकंच काय पुढील काळात जसाजसा प्रचार वाढेल तसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते येऊन प्रचार करतील असेही बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या पुण्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठाण मांडून आहे. कुठल्याही परिस्थितीत भाजपचाच विजय व्हायला हवा यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस हे स्वतः मैदानात उतरले आहे. बावनकुळे यांच्यासोबतच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील पुण्यात तळ ठोकून आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसऱ्या बाजूला पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीतील स्थिती काय आहे? भाजपला यश मिळेल का ? सर्व्हे काय सांगतो? असे प्रश्न विचारताच बावनकुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. निकालाच्या दिवशी कळेल कोण निवडणूक येईल? असं बावनकुळे म्हणाले.याशिवाय मी काही सर्व्हे करणारा नाही. माझं काम हे प्रचार आणि प्रसार करणे हे आहे. जशी मतदान प्रक्रिया जवळ येईल. तसे तसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते पुण्यात येतील. असेही बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. एकूणच पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या मॅरेथॉन बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमक्या काय सूचना दिल्या आहेत? काय रणनीती ठरली आहे? यावरही बोलणं टाळत बावनकुळे यांनी प्रचार दौरा सुरू केला आहे.