मसुरे प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील बांदेवाडी श्री हनुमान मंदिर येथे ८६ वर्षाची परंपरा जोपासत बांदकर पार्टी व गावघर तर्फे ०६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त ०५ एप्रिल रोजी रात्री १०:०० पासून स्थानिक भजन(जागर) ०६ एप्रिल रोजी सकाळी ०७ वाजता जन्मोत्सव सकाळी ०८:३० दिंडी आणि भजनसकाळी ११:०० वाजता श्री सत्यनारायण पूजादुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ०३:३० वाजता लहान मुलांसाठी स्पर्धा, सायंकाळी विद्यार्थी गुणगौरव बक्षिस समारंभ, रात्रौ ०८:०० पासून पंचक्रोशीतील भजन. उपस्थीतीचे आवाहन करण्यात आले आहे.