देवगड: तालुक्यातील पुरळ गावात दि. २१ रात्री धक्कादायक घटना घडली असून राहत्या घरातील पुढच्या गॅलरीत थेट बिबट्याने घुसून त्या आवारात असणा-या कुत्र्यावर हल्ला करून त्याला घेऊन गेल्याने पुरळ गावात एकच घबराट निर्माण झाली असून थेट भरवस्तित बिबट्या घुसल्याने वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावे असे नागरीकांकडून सांगण्यात येत आहे. पुरळ येथील शैलेश मराठे यांच्या दोन कुत्रे गॅलरीत बांधून ठेवलेले होते याच दरम्यान शुक्रवारी रात्री थेट बिबट्याने घरातील गॅलरीत उडी मारून कुत्र्यावर हल्ला करत त्याला घेऊन गेला या दरम्यान दुसरा कुत्र्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तो कसा बसा बचावला.
आतापर्यंत पडेल आणि पुरळ परिसरातील सहा पाळीव कुत्र्यांना भक्ष्य केलं आहे. यामुळे भर वाडी वस्तीत घुसून बिबटयाची शिकार करत असल्याचे अनेक वेळा घडत असल्याने रात्रीचे फिरणेही नागरीकांचे धोक्याचे झाले आहे.तर सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी ग्रामस्थांच्या हा बिबट्या नजरेस पडत असल्याने लहान ते वयोवृद्ध व्यक्तीच्या मनात घबराट निर्माण झाली आहे.याबाबत बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून नेताताचा सिसिटिव्ही फुटेज हाती लागल्याने थेट घटना कॅमेर्यात कैद झाली आहे.
