मालवण प्रतिनिधी: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सर्वांनी मनापासून एकत्रित यावं परस्परांतील विश्वास, स्नेह वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने श्री वेताळ मंदिर नजीक (नाडाळा) देऊळवाडा मसुरे, ता. मालवण येथे रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत वार्षिक स्नेह मेळावा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर यांच्या संयोजनाखाली हे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित होते.
यामध्ये उद्घाटक मान. मेघना जोशी, मुख्याध्यापिका मान. अर्चना कोदे, मान. विराणी सातार्डेकर, आद. संतोष लुडबे, मान.महेश बागवे, मान. शिल्पा खोत मॅडम, मान. फॅनी मॅडम, सौ.श्रमिका लुडबे, मान. कृष्णा साळसकर मा. सौ.रसिका परब, सौ.नीलिमा रावले, पत्रकार बंधू मान.संतोष अपराज, सौ भारती वाईरकर, मान.अशोक मसुरकर,श्री.प्रकाश राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सलग सहा वर्ष मसुरे देऊळवाडा सारख्या ग्रामीण भागात महिलांच्या विकासासाठी त्यांच्या आनंदासाठी सतत धडपडणाऱ्या सौ.वर्षाराणी बलवंत अभ्यंकर ताईंची श्रीफळ साडी व त्यांच्या चाललेल्या सामाजिक कार्यासाठी आपलाही खारीचा वाटा म्हणून रोख रक्कम ३५०० रु. श्री संतोष लुडबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले. तसेच शिल्पा खोत मॅडमनी त्यांना स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित केले. तसेच एक निष्ठावान कार्यकर्त्या सौ राजश्री घाडीगावकर यांनीही एक प्रेमाची भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित केले..
त्यानंतर संयोजिकेच्या भूमिकेतून संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात नियोजनात सलग सहा वर्ष मोलाची साथ देणाऱ्या आपल्या सर्व निष्ठावान महिला कार्यकर्त्यांचा सत्कार, सन्मान पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांच्याच हस्ते व्यासपीठावर करण्यात आला. हा सन्मान सर्व भगिनींनी स्वीकारावा अशी अभ्यंकर मॅडमची आग्रही भूमिका होती. सन्मानाचं स्वरूप हे केवळ पुष्पगुच्छ असलं तरी त्या मागची भावना ही लाख मोलाची असल्याचे सांगत यावेळी भावुक झाल्या.
यावेळी दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मनोरंजनात्मक नानाविविध करमणुकीचे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये पाककला स्पर्धेसाठी यंदा “नाचणी” हा घटक निवडण्यात आला होता. यामध्ये अनुक्रमे नंबर पटकाविलेल्या ची नावे व निकाल खालील प्रमाणे..
प्रथम क्रमांक. सौ.प्रियांका परब,
द्वितीय सौ. रचना दिनेश मेस्त्री
तृतीय.. सौ.अक्षता मेस्त्री यांनी तर
उत्तेजनार्थ ..
सौ.संजना बागवे व सौ .दीप्ती मेस्त्री तसेच सौ.अभ्यंकर व कुटुंबीय पुरस्कृत “खेळ पैठणीचा”या खेळातील मानाच्या पैठणीची मानकरी सौ. प्रज्ञा साईप्रसाद बागवे ठरली.
एकूणच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम पार पडलेल्या स्नेह मेळाव्यात, या आनंद सोहळ्यात यावेळी उत्तम मंडप व्यवस्था. श्री प्रकाश सांडव,प्रशांत सांडव यांनी केली. कार्यक्रमासाठी लागणारी सर्व फुले फ्लाईंग बर्ड्स इंग्लिश स्कूल, (पुणे )चे चेअरमन मान.जयंत जयराम परांजपे यांनी दिली. तर कार्यस्थळ जागा व विद्युत व्यवस्थेची मोलाची मदत श्री प्रकाश परब,श्री.प्रसाद परब यांची लाभली. उत्तम सुग्रास भोजनाची व्यवस्था श्री.अनिल सावंत व आपल्या निष्ठावान महिला भगिनी, ग्रामस्थ युवा वर्ग यांनी पाहिली.
दरवर्षीप्रमाणे च अत्यंत तळमळीने,आपलेपणाने सगळ्यांनी सर्वतोपरी मदत केली .यामध्ये वेताळ टेंब, पन्हळकर टेंब दत्तवाडी, देऊळवाडा, तुरी दाढे वायंगणी , ख्रिस्तवाडी, बौद्ध वाडी, देऊळवाडा, आदी सगळ्याच वाड्यातील म्हणजेच मसुरे देऊळवाड्यातील सर्व ग्रामस्थ महिला युवावर्ग या सगळ्यांया उत्तम साथीमुळेच नेहमीसारखाच कार्यक्रम यशस्वी होत एक वेगळ्या उंचीवर पोहचला. याचे सारे श्रेय सर्व ग्रामदेवता व आपल्या बरोबर वावरणाऱ्या ईश्वर स्वरूप प्रत्येक हाताला जातं असल्याच प्रतिपादन सौ.अभ्यंकर मॅडम नी आपल्या आभार प्रदर्शनात केलं. या संपूर्ण कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन कु. श्रेया कुलकर्णी यांनी केलं. तर प्रास्ताविक व आभार संयोजका सौ.वर्षाराणी अभ्यंकर मॅडम यांनी मानले.