Home स्टोरी दुष्काळ स्थिती भोगणार्‍या मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांची ४५ सहस्र कोटींच्या निधीची घोषणा !

दुष्काळ स्थिती भोगणार्‍या मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांची ४५ सहस्र कोटींच्या निधीची घोषणा !

107

१७ सप्टेंबर वार्ता: मराठवाड्यासाठी महत्त्वाची असलेली राज्य मंत्रीमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर या दिवशी पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी ४५ सहस्र कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. यात सिंचनासाठी २७ सहस्र कोटी रुपयांच्या निधीला संमती देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यासह नदीजोड प्रकल्पासाठी १४ सहस्र कोटी रुपयांच्या निधीला संमती देण्यात आली आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत ५९ सहस्र कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंत्रीमंडळाने संमती दिली आहे. ‘या माध्यमातून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे’, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तुळजाभवानी मंदिर विकासासाठी १ सहस्र ३८५ कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. – मराठवाड्यासाठी महत्त्वाची असलेली राज्य मंत्रीमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर या दिवशी पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी ४५ सहस्र कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. यात सिंचनासाठी २७ सहस्र कोटी रुपयांच्या निधीला संमती देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यासह नदीजोड प्रकल्पासाठी १४ सहस्र कोटी रुपयांच्या निधीला संमती देण्यात आली आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत ५९ सहस्र कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंत्रीमंडळाने संमती दिली आहे. ‘या माध्यमातून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे’, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तुळजाभवानी मंदिर विकासासाठी १ सहस्र ३८५ कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले…

 

१. शनी देवगाव उच्च पातळी बंधार्‍याला २८५ कोटी रुपये

२. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्याच्या प्रकल्पासाठी १४ सहस्र ४० कोटी रुपयांची मान्यता

३. औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ६० कोटी रुपये

४. मराठवाड्यातील दूध उत्पादनाला वेग देण्याच्या प्रस्तावित योजनेसाठी ३ सहस्र २२५ कोटी रुपयांचा निधी

५. एका गावात किमान ५० दुधाळ जनावरांचे अनुदान तत्त्वावर वाटप

६. नांदेड येथे गोदावरी घाट साबरमती नदीच्या धर्तीवर ‘रिव्हर फ्रंट म्हमऊन’ विकसित करण्यासाठी १०० कोटी रुपये प्रस्तावित

७. परभणी येथील पाथरीतील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ९१.८० कोटी रुपये

८. ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली

९. मराठवाड्यासाठी पाणी वळवण्याचा निर्णय

१०. मराठवाड्यातील ग्रामपंचायतींना संकेतस्थळांनी जोडणीसाठी २८४ कोटी रुपये

११. पुणे – संभाजीनगर मार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ बसवण्यास १८८ कोटी रुपये

१२. पैठण येथे संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्यास १५० कोटी रुपये