सावंतवाडी प्रतिनिधी: दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेला तीन लॅपटॉप प्रदान करण्यात आले. दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई ही स्वयंसेवी संस्था २००८ मध्ये स्थापन करण्यात आली. महाराष्टातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या किल्ल्याचे श्रमदानातून संवर्धन व डागडुजी करण्याच्या महान हेतूने या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. गेली अनेक वर्षे दुर्गवीर प्रतिष्ठानचे मावळे अध्यक्ष श्री.संतोष हुसुरकर यांच्या नेतृत्वाखाली किल्ले संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहेत.या कार्याबरोबरच शैक्षणिक व सामाजिक संघटनात्मक कार्यात हे प्रतिष्ठान कार्यरत आहे. महाराष्ट्रातील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असताना तंत्र स्नेही विद्यार्थी घडविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीस प्राथमिक -माध्यमिक शाळांना उच्च प्रतीचे लॅपटॉप प्रदान करुन आपली शैक्षणिक क्षेत्रातील बांधिलकी जोपासली आहे.या कार्यक्रमा निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे यांनी दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण मुलांसाठी लॅपटॉप उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम प्रगत विद्यालय रामगड येथे संपन्न झाला.यावेळी दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष श्री. संतोष हुसुरकर,त्यांचे सर्व पदाधिकारी, सिंधुदुर्ग प्रमुख श्री.दळवी, श्री.मिलिंद चव्हाण, रामगड हायस्कूलचे उपाध्यक्ष श्री.सुभाष तळवडेकर, संचालक श्री.अभय प्रभुदेसाई, श्री.घाडीगांवकर, सरपंच श्री.शुभम मटकर मुख्याध्यापक श्री.अंकुश वळंजू,आडवली हायस्कूल मुख्याध्यापक श्री.तुषार सकपाळ, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, रामगड हायस्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.दिनेश सावंत यांनी केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा रामगड हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम यशाबद्दल शिरवंडे हायस्कूल मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच देवबाग हायस्कूल व माडखोल प्राथमिक शाळा प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला.
Home स्टोरी दुर्गवीर प्रतिष्ठान,मुंबई, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेला...