१५ जुलै, दुबई वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर संयुक्त अरब अमिराती दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. दुबईचा ‘बुर्ज खलिफा’ पंतप्रधानांच्या आगमनानिमित्त भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळला होता. बुर्ज खलिफा’वरील ‘लाइट-अँड-साऊंड’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींच्या आगमनासाठी मंच तयार केला. या गगनचुंबी इमारतीवर पंतप्रधान मोदींची प्रतिमाही लावण्यात आली होती. यानंतर आलेल्या संदेशात लिहिले होते, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत आहे.’
पंतप्रधान मोदींचे युएईमध्ये आगमन होताच विमानतळावर त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. आखाती राष्ट्रात झालेल्या हार्दिक स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पंतप्रधान मोदी यांनी आपण आभारी असल्याचे ट्वीट केले आहे. माझे स्वागत केल्याबद्दल आपण क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान क्राऊन यांचे आभार व्यक्त करीत असल्याचे नमूद केले.
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी महत्वाच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी चर्चा करणार आहेत.