Home स्टोरी दिव्यांग निराधार डिमेलो भगिनी व शिंदे भगिनी यांच्या मदतीला पुन्हा धावले काळसे...

दिव्यांग निराधार डिमेलो भगिनी व शिंदे भगिनी यांच्या मदतीला पुन्हा धावले काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष दिव्यांग बंधू विनोद धुरी.

124

सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सामाजिक कार्यामध्ये सातत्य ठेवून शहर व गावागावात जाऊन संकटात असलेल्या कुटुंबांना यथाशक्ती मदत करत आहे. सामाजिक बांधिलकीच्या या सेवाभावी संस्थेच्या कामाची दखल घेऊन जिल्ह्यातील अनेक संस्था सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी जोडल्या जात आहेत.त्यातील काळसे पंचकोशी अपंग सेवा संस्था या संस्थेचे अध्यक्ष आपले दिव्यांग बंधू विनोद धुरी यांना स्वतःच्या पायाने चालता येत नाही त्यांचे सहकारी विनायक चव्हाण त्यांना उचलून घेऊन दिव्यांग व निराधार व्यक्तींच्या घरापर्यंत पोचवतात. आज पुन्हा एकदा धुरी आपले सहकारी विनायक चव्हाण, सौ उर्मिला चव्हाण व शुभम वेंगुर्लेकर यांच्यासह सावंतवाडी शहरांमध्ये येऊन डिमेलो दिव्यांग भगिनींना जीवनावश्यक साहित्य त्याचबरोबर प्रत्येकी नवीन चादर, ब्लॅंकेट, बेडशीट व चटई इत्यादी वस्तू त्यांच्यासाठी घेऊन आले होते.
त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकीने आव्हान केलेल्या निराधार किडनीचा आजार असलेल्या शिंदे यांना मदतीचा हात देऊन त्यांनी इतर संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे शिंदे कुटुंबांना डॉक्टर उपचारासाठी आधार देण्याचे आवाहन केले आहे.

धुरी हे एका गरीब शेतकरी कुटुंबातील असून गेले १८ वर्षे ते सायकल रिपेरिंगचे काम करून मिळालेल्या पैशात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात व काही पैसे ते आपल्या दिव्यांग बांधवांच्या खर्चासाठी बाजूला काढून ठेवतात तर काही वेळा आपल्या मित्रमंडळी कडून दिव्यांग बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मागणी करून त्या वस्तू आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन गरजू व निराधार दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचतात.
असे हे त्यांचे सामाजिक कार्य पाहून आमच्या सामाजिक बांधिलकीतील प्रत्येक कार्यकर्त्याला अजून ऊर्जा मिळाली आहे असे मत रवी जाधव यांनी व्यक्त केले.

त्यांच्या या सेवा भावी कामाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीरा खलील, रुपा मुद्राळे, रवी जाधव, श्याम हळदणकर, सुजय सावंत, हेलन निबरे,शरद पेडणेकर, अशोक पेडणेकर, प्रसाद कोदे व शेखर सुभेदार यांनी करून त्यांचे आभार मानले.