Home स्टोरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावर “उधना ते मंगळुरू” स्पेशल गाडी धावणार….

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावर “उधना ते मंगळुरू” स्पेशल गाडी धावणार….

184

१ नोव्हेंबर वार्ता: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावर गुजरात सुरतज येथील उधना ते मंगळुरू गाडी न. 09057/ 09058 हि कोकण रेल्वेमार्गे  विशेष गाडी शुक्रवार दि. ३ नोव्हेंबर २०२३ पासून धावणार आहे. आठवड्यातून दोन दिवस अशप्रमाणे ही गाडी दि. ३ नोव्हेंबर २०२३ पासून दि. १  जानेवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे.  ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी, मडगाव जं., कानाकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबे घेणार आहे.