Home क्राईम दिल्ली येथील बेपत्ता मुलगी प्रकरणी वेंगुर्ला येथील जावेद मकानदार सह आणखी एकाचा...

दिल्ली येथील बेपत्ता मुलगी प्रकरणी वेंगुर्ला येथील जावेद मकानदार सह आणखी एकाचा सहभाग!

194

दिल्ली पोलिस वेंगुर्लेत: त्याला दिली दिल्लीत हजर राहण्याची नोटीस….

 

 

वेंगुर्ले प्रतिनिधी:

दिल्ली येथून बेपत्ता झालेल्या आणि वेंगुर्ले येथे आढळलेल्या ‘त्या” पिडीत मुलीने दिल्ली न्यायालयात दिलेल्या जबाबा मध्ये या गुन्ह्यात अश्रफ मुजावर रा. वेंगुर्ला याचे ही नांव घेतल्याने आज दिल्ली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कुमार यांनी तपास कामी वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे आलेले होते. त्यांनी सदर गुन्ह्यातीचे कामी चौकशी करता अश्रफ मुजावर याला ताब्यात घेऊन त्याचे कडे चौकशी करून त्याला दिल्ली, जहांगीरपुरी पोलीस ठाणे येथे हजर राहणे बाबत नोटीस दिलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

वेंगुर्ला शहरात दिल्ली येथील अल्पवयीन मुलगी आपल्या घरात कोणासही न सांगता तिचा वेंगुर्ला येथील इंस्टाग्राम वरील मित्र जावेद मकानदार, रा. पिराचा दर्गा, ता. वेंगुर्ला याचेकडे आलेली होती. याप्रकरणी नॉर्थ वेस्ट दिल्ली जहांगीरपुरी पोलिसांकडे भा. द. वि. क. ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी वेंगुर्ले येथे येऊन त्या मुली बाबत वेंगुर्ले पोलिसांकडून माहिती घेऊन संशयित मकानदार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

वेंगुर्ले पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती मिळतच वेंगुर्ला पोलीस निरीक्षक श्री. अतुल जाधव यांनी त्या अल्पवयीन मुलगीची चौकशी केली. त्यावरून ती दिल्ली येथून घरातून निघून आल्याबाबत समजले.

त्यामुळे सदर अल्पवयीन मुलीची दिनांक ३० जून रोजी वैदयकिय तपासणी करुन तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने अंकुर केंद्र सावंतवाडी येथे जमा केले. दरम्यान १ जुलै रोजी गुन्हयाच्या तपासा अनुषंगाने दिल्ली पोलीस वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे आल्याने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांच्या मदतीने दिल्ली पोलिसानी सदर गुन्ह्यातील संशयित जावेद मकानदार याला ताब्यात घेतले. तसेच अंकुर येथे जमा केलेल्या अल्पवयीन मुलीस वेंगुर्ला पोलिसानी दिल्ली पोलिसाच्या ताब्यात दिलेले होते.

दरम्यान दिल्ली पोलिसांनी सदर गुन्हयात भादवी ३७६ सह पोक्सो वाढीव कलम लावुन संशयित आरोपी जावेद ताजुददीन मकानदार, वय ३६ वर्षे, याला तेथील न्यायालयात हजर केल्या नंतर त्या तपासात आणखी एक जण असल्याचे समोर आल्याने दिल्ली पोलीस पुन्हा वेंगुर्ले येथे आज दाखल झाले आणि त्यांनी आपल्या परीने तपासाची सूत्रे हलविली आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणी आहे का याची चौकशी सुरू झाली आहे.