Home स्टोरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच इतरांविरुद्ध तक्रार दाखल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच इतरांविरुद्ध तक्रार दाखल

97

२७ मे वार्ता: गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याच्या उद्देशाने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या आयोजनाच्या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जातीचा उल्लेख करत प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.कलम 121,153A, 505 आणि 34 IPC अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजकीय फायद्यासाठी भारत सरकारवर अविश्वास निर्माण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

रविवार डि.२८ मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवन इमारतीचे लोकार्पण केले जाणार आहे. देशातील अनेक विरोधी पक्षांकडून याला विरोध केला जात आहे. संसदेच्या इमारतीचे उद्घाटन हे राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी करावे अशी विरोधकांची मागणी आहे. यादरम्या करण्यात आलेल्या वक्तव्यावरून आता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांच्यासह इतर नेत्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.