संच मान्यतेच्या GR मुळे अनेक ग्रामीण भागातील शाळा उध्वस्त, बंद होतील.
शिक्षक संघटनेला युवासेनेचा पाठिंबा -युवासेना तालुकप्रमुख योगेश धुरी
कुडाळ प्रतिनिधी: संच मान्यतेच्या GR वरून कुडाळ युवासेना तालुकप्रमुख योगेश धुरी यांनी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी उध्वस्त माणसांकडून अजून कांय अपेक्षा करावी? असा प्रश्न उपस्थित करत योगेश धुरी म्हणाले की, नवीन शिक्षक द्यायचे असतील तर त्या गटामध्ये निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी असावेत. ही अट नव्याने आली आहे. उदाहरणार्थ पाचवीला वाढीव पद द्यायचे असेल तर पुढील शिक्षक मान्य साठी कमीत कमी १६ विद्यार्थी असावेत, सहावी ते आठवीला १८ असावेत. मुख्याध्यापक पदावर मात्र घाला घातला आहे. १०० विद्यार्थी संख्येची अट १५० विद्यार्थी संख्येवर आली आहे. मुख्याध्यापक समायोजन नाही झाल्यास वेतनाला संरक्षण देऊन थेट शिक्षक म्हणून समायोजन केले जाईल. परंतु कार्यभारासाठी इयत्ता सहावी ते दहावीचे विद्यार्थी संख्या गृहीत धरली जाईल असे म्हटले आहे, म्हणजे माध्यमिक शाळा कडील पाचवीची विद्यार्थी संख्या गृहीत धरली जाणार नाही. जिल्ह्यातील डी. एड. धारकांना देशोधडीला लावलं. आता अश्याप्रकारे शाळा बंद करून खासगीकरण करून शाळा, शाळेची जागा, इमारत धन्या दांडग्यांच्या खिशात घालण्याचा विचार आहे काय? जिल्हातील डी. एड. धारकांना डावलणे, राणेच्या माध्यमातून डी. एड. धारकांचं आंदोलन चिरडणे आणि केसरकरांनी शिक्षक भरती लावणे, ह्या राणे केसरकर जोडीने ठरवून काही गोष्टी केल्या आहेत असे दिसते. असा आरोप कुडाळ युवासेना तालुकप्रमुख योगेश धुरी यांनी केला आहे.
तसेच ह्या GR ची जिल्हात अंबलबजावणी होऊ नये, तसे झाल्यास युवासेना शिक्षक संघटनेच्या मागे उभी राहील, आणि ह्या लढ्याला शिक्षक संघटनेला युवासेनेचा पाठिंबा आहे. असे योगेश धुरी यांनी स्पष्ट केले आहे.