Home राजकारण दिपक केसरकरांचे जादूचे खेळ संपुर्ण महाराष्ट्राला दाखवू! योगेश धुरी

दिपक केसरकरांचे जादूचे खेळ संपुर्ण महाराष्ट्राला दाखवू! योगेश धुरी

215

मातोश्रीच्या पायऱ्या झरवून पालकमंत्री, गृहराज्यमंत्री, अर्थ एवढ्या मोठ्या पदावर पोचलात, खालेल्या ताटात घाण करण्याची केसरकरांची मूळची सवय…. 

कुडाळ प्रतिनिधी: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी  शिक्षण मंत्री दीपक केसरकरांवर खोचक शब्दात टीका केली. त्यांना प्रत्युत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. त्यानंतर आता जिल्ह्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आरोप आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यादरम्यान  ठाकरे गटाचे कुडाळ तालुका प्रमुख योगेश धुरी यांनीहि शिक्षण मंत्री दीपक केसरकरांवर खोचक शब्दात टीका केली आहे.

योगेश धुरी म्हणाले की, ज्यांच्या जीववर पालकमंत्री झालात त्यांच्यावर बोलतांना लाज वाटली पाहिजे. केसरकर वयाचा मान राखण्यासाठी आपण प्रामाणिक असावं लागतं, लोचटगीरी करून मानाची अपेक्षा कशी काय करता? जिल्ह्यातील डीएडच्या उमेदवारांच्या पोटावर लाथ मारलात. शिक्षण विभागात केसरकरांच्या आदेशाप्रमाणे खुल्या वर्गातील म्हणजेच मराठा, ख्रिश्चन, मुस्लिम या लोकांवर अन्याय झाला आहे. केसरकर म्हणजे जिल्ह्याला लागलेला कलंक आहे. सावंतवाडीत सेटअप बॉक्स चा प्रकल्प अजून चालूच झाला नाही. ड्रोन च्या माध्यमातून हा प्रकल्प शोधावा लागेल. केसरकरांच्या आशीर्वादाने सावंतवाडीत अवैध धंदे जोरदार चालू आहेत. केसरकरांच्या आशीर्वादाने सावंतवाडीत अफू गांज्याचे पेव फुटले आहेत. अनेक तरुण या विळख्यात अडकत चालले आहेत.आमदार वैभवजी नाईक यांनी महिला हॉस्पिटल मंजूर करून बांधून ते लोकसेवेसाठी सुरू पण केलं आणि केसरकर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल साठी अजून जागाच शोधता आहेत. रंग बदलणारे प्राणी एवढे रंग बदलत नाहीत तेवढे केसरकर आपले रंग बदलत असतात. आमदार वैभवजी नाईक हे कुडाळ मालवण मधील ज्या लोकांनी निवडून दिले त्यांच्या गणेशाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत आहेत. तर दुसरीकडे केसरकर लोचटा सारखे भाजच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या गणपतींचे दर्शन घेत आहेत. केसरकर तुमच्या सगळ्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. आमच्या नेतृत्वावर बोललात तर तुमचे जादूचे खेळ महाराष्ट्राला दाखवू. असा इशारा ठाकरे गटाचे कुडाळ तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी दिला आहे.