सावंतवाडी प्रतिनिधी: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माडखोल व कलंबिस्त विभागाचे युवा सेनेचे विभाग प्रमुख दिनेश पुंडलिक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा सेनेचे सचिव वरूण सर देसाई व खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी श्री सावंत यांनी स्पष्ट केले की सह्याद्री पट्ट्यातील माडखोल सांगेली कलंबिस्त सावरवाड वेले शिरशिंगे ओवळी य देवसु या भागात निश्चितपणे शिवसेना पक्ष बळकट केला जाईल. या भागात युवकांची फळी अधिक मजबूत करून युवकांच्या हातांना पक्षाच्या माध्यमातून रोजगार नोकरी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील. असे स्पष्ट केले.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट व युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर नानोस्कर, युवा सेना महिला पदाधिकारी कुमारी रुची राऊत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, युवा सेना तालुकाप्रमुख कौस्तुभ गावडे, आदी उपस्थित होते. सावंतवाडी तालुक्यात युवा सेना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने पक्षाने पावले उचलले आहेत. त्या दृष्टीने युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. माडखोल विभागात युवा सना विभाग प्रमुख पदी श्री सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री दिनेश सावंत हे गेली पाच वर्ष हुन अधिक काळ शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत. कलंबिस्त गावचे ते शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या शाखाप्रमुख पदाच्या कारकिदीत तब्बल २५ वर्षानंतर गावची ग्रामपंचायतवर शिवसेना पक्षाचा झेंडा फडकला. या गावात त्यांनी शिवसेना पक्ष अधिक बळकट केला आहे. त्यांच्या एकंदरीत पक्षासाठी त्यांचे योगदान पाहून त्यांच्यावर युवा सना विभाग प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
श्री सावंत म्हणाले की, आपण तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, तालुका युवासेना प्रमुख कौस्तुभ गावडे, रमाकांत राऊळ, पुरुषोत्तम राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, दिलीप राऊळ, सुरेश शिर्के व युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, मायकल डिसोजा, बाळूमाळकर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चितपणे काम करणार आहे आणि या भागात युवासेना बळकट केली जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले.
फोटो: सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या युवा सेना माडखोल विभाग प्रमुख पदी दिनेश सावंत यांना नियुक्तीपत्र देताना युवा सेना सचिव वरूण सरदेसाई , खासदार विनायक राऊत, बाजूला रुची राऊत, मंदार शिरसाठ, संजय पडते, आमदार वैभव नाईक आदी.