Home क्राईम दिक्षा पेडणेकर – चौककर यांची आत्महत्या नव्हे तो घातपातचं..! नातेवाईकांना घटनेवर...

दिक्षा पेडणेकर – चौककर यांची आत्महत्या नव्हे तो घातपातचं..! नातेवाईकांना घटनेवर संशय.

360

सावंतवाडी: येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांची भगिनी सौ. दीक्षा लक्ष्मीकांत पेडणेकर चौकेकर राहणार वेंगुर्ला हिने आत्महत्या केली नसून तिचा घातपात करण्यात आल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. कारण दीक्षा हिच्या डोक्याच्या एका बाजूला भला मोठा घाव करण्यात आला असल्यामुळे तिने आत्महत्या केली नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, उभादांडा (वेंगुर्ला) येथे राहणाऱ्या व वेंगुर्ला पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या चौकेकर हिचे बंधू व माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी व संपूर्ण पेडणेकर कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूची अर्थात आत्महत्या केल्याची बातमी मिळाल्यावर वेंगुर्ला येथे धाव घेतली. तेथील एकूण वस्तुस्थिती बघितल्यावर कोणालाही दीक्षा हीने आत्महत्या केली यावर विश्वास बसणार नाही. कारण दीक्षाच्या डोक्याला भली मोठी जखम झालेली होती. फरशीवर पडलेले रक्त देखील गायब करण्यात आले असून ज्या कपड्यांनी ते रक्त पुसले ते कपडे देखील गायब झाले होते. आणि ज्या ठिकाणी तिने गळफास घेतला तीची उंचीही खूप होती. म्हणजेच खुर्चीवर उभे राहूनसुद्धा ती दोरी टाकू शकत नव्हती. मग तिचा हात दोरी अडकवायला पोहोचला कसा.?,

विशेष म्हणजे तिच्या डोक्याला झालेला जबरी घाव कसा झाला? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीत राहतात. म्हणून त्यादृष्टीने सखोल तपास होणे गरजेचे आहे, असे पेडणेकर कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

डोक्यावर घाव कसा पडला.?’ याबाबत तिच्या कुटुंबीयांकडून बालिश खुलासा केला गेला तो असा की आम्ही तिला फासावरून खाली उतरवीत असताना ती खाली पडली आणि तिचे डोके फुटले.

म्हणजेच फासावरून खाली उतरवायला दोन माणसे असतानाही ती खाली फरशीवर पडलीच कशी? आणि पडली तरी एवढा मोठा घाव कसा पडू शकतो.?,

अशी अनेक संशयास्पद उत्तरे त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक पद्धतीने तपास करावा आणि या घटनेमागील सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी कुटुंबीयांकडून व समाजातून जोर धरू लागली आहे.