सावंतवाडी: आज समाजामध्ये सर्वसामान्य गोरगरीब लोकांना अभिषेक दाखवून लुभडण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे दाम दुप्पट रक्कम होण्याच्या नादात अनेक लोक अशा आमिषाला बळी पडत आहेत. सर्वसामान्य गोरगरिबांनी बँक अथवा पोस्टातील किसान विकास एफडी मध्ये आपले पैसे गुंतवावेत अशाच एका महिलेला अकरा लाख रुपयाचा गंडा घालण्यात आला होता. मात्र कर्तव्यदक्ष पोलीस महिला अधिकारी सौ संध्या गावडे यांच्या माध्यमातून सदर महिलेला पाच लाख रुपये मिळवण्यात यश आले आहे. उर्वरित रक्कम लवकरच उपलब्ध होणार आहे पोलीस विभाग दक्ष आहे. पोलीस विभागाच्या दक्षतेमुळेच दाम दुप्पट करून देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणे सुलभ झाले आहे. त्यामुळे अशा आमिष दाखवणाऱ्या व्यक्तींपासून लोकांनी सावध राहावे असे आवाहन भाजपच्या महिला मंडळ शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर व मिसबा शेख यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी सौ साक्षी गवस, सुकन्या टोपले, मेघना साळगावकर, अर्चना खोबरेकर आदी उपस्थित होते. सौ मोहिनी पुढे म्हणाल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाम दुप्पट रक्कम करून देतो असे सांगून अनेक जण सर्वसामान्य गरीब लोकांना फसवत आहेत. मात्र लोकांनीच आता सतर्क राहणे आवश्यक आहे. लोक अशा आमिषाला बळी का पडतात. असा सावलायतीने करून एक सर्वसामान्य महिला कुटुंब अकरा लाख रुपयाला फसली होती. या महिलेच्या कुटुंबीयाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने आम्ही प्रयत्न केले. यामध्ये सावंतवाडीच्या उपविभागीय महिला पोलीस अधिकारी यांची नुकतीच मुंबई जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली. त्या संध्या गावडे यांनी अशा भामट्या व्यक्तींचा शोध घेऊन आणि सतर्कतेने सदर महिलेला अकरा लाख रुपयाला जी फसवणूक होणार होती तिला न्याय मिळवून देण्यात यश आले. सदर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने पहिल्या हप्त्यात पाच लाख रुपये दिले आहेत. तर उर्वरित रक्कम दिली जाणार असल्याचे आश्वासन सदर कंपनीने दिली आहे. पोलीस दक्षतेने काम करत आहेत आणि नेहमी पोलीस आव्हान करत आहेत. की अशा आमिषाला बळी पडू नका मात्र गोरगरच सर्वसामान्य लोक आमिषाला वारंवार बळी कसे काय पडतात असा सवाल तिने करून सर्वसामान्य लोकांनी किसान विकास अथवा एफ डी मध्ये आपले पैसे गुंतवावेत असे आवाहनही केले आहे. पोलिसांबाबत नेहमी विरोधक टीका करत आहेत मात्र पोलीस आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावत आहेत आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळेच दाम दुप्पट रक्कम करून देतो अशा व्यक्तीवर कारवाई झाली आहे. त्यामुळे पोलिसांचे आम्ही विशेष कौतुक करत असल्याचे त्या म्हणाल्या यावेळी ज्यांची फसवणूक झाली त्या सौ खोबरेकर म्हणाल्या पोलिसांचे सहकार्य आणि मोहिनी मडगावकर च्या टीमने आम्हाला न्याय मिळवून दिला. त्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत मात्र अन्य लोकांनी अशा आमिषाला बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी केले.