Home स्टोरी दादासाहेब उंडाळकर विद्यालय उंडाळे ता.कराड येथे विद्यार्थ्यांमार्फत प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाची जनजागृती करण्यासाठी परिपत्रक...

दादासाहेब उंडाळकर विद्यालय उंडाळे ता.कराड येथे विद्यार्थ्यांमार्फत प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाची जनजागृती करण्यासाठी परिपत्रक वाटप.

123

२२ सप्टेंबर वार्ता:

 

उंडाळे:– दादासाहेब उंडाळकर विद्यालय उंडाळे ता.कराड येथे विद्यार्थ्यांमार्फत प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाची जनजागृती करण्यासाठी परिपत्रक वाटप करण्यात आले. पत्रकांचे प्रकाशन करताना प्राचार्य बी. आर. पाटील, पर्यवेक्षक जे एस माळी, गुंड एन एम, पाटील एस आर, बाबर पी एम, प्रदीप ओंबासे आदी उपस्थित होते.

 

 

पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेतलेल्या एस. आर. दळवी (I) फाउंडेशन व स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असून याबाबत जनजागृती करण्यासाठी 1500 पत्रक छापून त्याचे विद्यार्थ्यांच्या मार्फत वितरण केले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 

वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत यामध्ये जल, ध्वनी, वायू प्रदूषणाचे प्रमाण मोठे आहे त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे त्याचाच एक भाग म्हणून, स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालय व एस आर दळवी फाउंडेशन यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे गणेशोत्सव दरम्यान डेकोरेशन साठी प्लास्टिक, थर्माकोल वापरू नये, मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर, डॉल्बी वाजवू नये, दिवसा विद्युत रोषणाई करू नये, मिरवणुकीत गुलाल फटाके यांचा वापर टाळावा. निर्माल्य पाण्यात विसर्जन करू नये, प्रबोधन पर कार्यक्रम सादर करावा. प्रदूषण रोखा असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.

 

अशी 1500 पत्रके परिसरातील महारुगडेवाडी, जिंती, टाळगाव, शेवाळवाडी,तुळसण, विठ्ठलवाडी, उंडाळे, नांदगाव, सवादे, येवती येळापूर, नाटवडे, चरण, अंबाबाई वाडी, कळंत्रेवाडी आदी गावातील गणेश मंडळांना देण्यात आली आहेत. या पत्रकाचे प्रकाशन प्राचार्य बी आर पाटील, पर्यवेक्षक जे एस माळी, धनंजय पवार, शंकर आंबवडे, प्रदीपकुमार ओंबासे, पी एम बाबर, डी बी जाधव, एस आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

एस.आर. दळवी फाऊंडेशनचे संस्थापक मान.श्री. रामचंद्र दळवी व मान.श्रीमती. सीता दळवी यांच्या निसर्ग प्रेमातून असे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात राबविले जात आहेत व यापुढेही आपल्याही जिल्ह्यात घेतले जाणार आहेत.

 

‌ ‌‌