Home स्टोरी दादर येथे सिद्धिविनायकाच्‍या ऑनलाईन दर्शनाच्‍या नावाखाली पैसे उकळणारा अटकेत !

दादर येथे सिद्धिविनायकाच्‍या ऑनलाईन दर्शनाच्‍या नावाखाली पैसे उकळणारा अटकेत !

115

मुंबई:  दादर येथील सिद्धिविनायकाचे दर्शन आणि पूजा यांसाठी भ्रमणभाष अ‍ॅपद्वारे नोंदणी करून पैसे उकळणार्‍या सुपर्नो प्रदीप सरकार याला दादर पोलिसांनी बंगाल येथून अटक केली आहे. तो भाविकांकडून ७०१ ते २१ सहस्र रुपये घेत असे. ज्‍या अधिकोषाच्‍या खात्‍यात हे पैसे वळवले गेले, ते सुपर्नो सरकारचे असल्‍याचे प्राथमिक अन्‍वेषणातून समोर आले आहे. दादर पोलीस आता सुपर्नोचे साथीदार सुब्रजित बसू, प्राजक्‍ता सामाता आणि अनिता डे यांचा शोध घेत आहेत. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्‍टच्‍या अधिकार्‍यांनी दादर पोलीस ठाणे येथे केलेल्‍या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलीस या प्रकरणाचे अन्‍वेषण करत आहेत.पेडर रोड येथील एका गृहिणीने ट्रस्‍टशी संपर्क साधून सांगितले, ‘‘माझी २१ सहस्र रुपयांची फसवणूक झाली आहे. माझ्‍या वडिलांना ब्रीच कँडी रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले होते. त्‍यांच्‍यासाठी तिला प्रार्थना करायची होती; म्‍हणून तिने उत्‍सव ‘अ‍ॅप’द्वारे ऑनलाईन पूजेची नोंदणी केली. त्‍याच आठवड्यात काही भाविक प्रसाद मागणीसाठी मंदिरात आले. त्‍यांच्‍याकडे पैशांविषयी विचारणा केल्‍यावर त्‍यांनी ‘उत्‍सव’ अ‍ॅपवरून ऑनलाईन दर्शन आणि पूजा केली असून प्रसाद मंदिरात मिळेल’, असे सांगण्‍यात आले होते’, असे सांगितले. प्रत्‍यक्षात पैशांची फसवणूक केली जाते.’’

 

‘कोणत्‍याही ‘अ‍ॅप’च्‍या माध्‍यमातून नोंदणी करू नये. नोंदणी करतांना सिद्धिविनायक मंदिर संस्‍थानच्‍या अधिकृत संकेतस्‍थळाला भेट द्यावी’, असे आवाहन ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आले आहे.