सावंतवाडी: गेली दहा वर्ष सातत्याने चालू असलेल्या दानोली ग्रामस्थ व मुंबई मंडळ यांच्या माऊली दिनदर्शिकेचे अनावरण लोकप्रिय युवा नेते संदीप जी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. संदीपजी गावडे यांचे या गावावर कृपा आशीर्वाद असल्यामुळे अनेक विकास कामे सुरू झालेली आहेत. प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी संदीप गावडे ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहतात. आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अनेक विकास कामांची गंगा दा, देवसू, केसरी या गावांमध्ये सुरू आहे. त्यामुळे आजच्या दिनदर्शिका अनावरण प्रसंगी सुद्धा संदीप यांनी पुनश्च एकदा दlनोली गावातील कोणतही विकासकाम असेल ते प्राधान्य क्रमाने पूर्ण करण्यात येईल .आणि जशी तुम्ही आजपर्यंत साथ दिला तसीच साथ पुढेही मला द्या, असं प्रतिपादन करून या दिनदर्शिकाचे अनावरण केले .यावेळी मुंबई मंडळ चे अध्यक्ष सिताराम लक्ष्मण सावंत त्याप्रमाणे खजिनदार विष्णू काशीराम सावंत, ज्ञानेश्वर सावंत, उमेश सावंत, पुंडलिक सावंत, मंगेश सावंत, दाजी सावंत, विश्वनाथ सावंत, मनोज सावंत, सुभाष सावंत, विजय सावंत, आनंद लटम, केतन लटम, धlनु सावंत, रवींद्र सावंत, उपस्थित होते.
ग्रामस्थांना माननीय संदीप जी गावडे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या .आणि ह्या सातत्याने चालू असलेल्या दिनदर्शिका उपक्रमाचे त्याने तोंड भरून कौतुक केले. तसेच विकासकमंlबद्दल मुंबई मंडळ व दानोळी ग्रामस्थ यांच्याशी चर्चाही चर्चा केली. यावेळी देवस्थानचे मंlनकरी काशीराम सावंत प्रभाकर सावंत, सातू सावंत, महेश सावंत हे उपस्थित होते.