Home स्टोरी दांडी शाळा येथील पाककला स्पर्धेत सौ.निर्झरा जोशी प्रथम.

दांडी शाळा येथील पाककला स्पर्धेत सौ.निर्झरा जोशी प्रथम.

157

मसुरे प्रतिनिधी: 

 

जि.प.पूर्ण प्राथ.शाळा मालवण दांडी या प्रशालेत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळास्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वयंपाकी, मदतनीस् ,ग्रामस्थ, पालक यानी स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेतला होता.प्रथम क्रमांक- सौ.निर्झरा नरेश जोशी,द्वितीय क्रमांक- कु.तनया विठोबा वायंगणकर, तृतीय क्रमांक-कु.उर्मिला साबाजी चव्हाण, उत्तेजनार्थ प्रथम- सौ.केतकी जगदिश कोयंडे, उत्तेजनार्थ द्वितीय-सौ.वैशाली हेमंत चिंदरकर,प्रोत्साहनार्थ बक्षिस- सौ.सुषमा सुभाष जोशी,सौ.प्रणिता उदय रेवंडकर,सौ.यशश्री यशवंत चांदेरकर,सौ.अन्वी आनंद धुरी,सौ.आरती अर्जून धुरी,सौ.प्रिया यशवंत धुरी,सौ.यशवंती यशवंत लोणे,सौ.प्रतिक्षा पंकज धुरी,सौ.रिया राजेश वराडकर,सौ,प्रियांका प्रविण कोळगे,सौ.तनुश्री तेजस तारी यांना मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आले.ही सर्व बक्षिसे दांडी शाळा शिक्षकवृंद यांनी पुरस्कृत केली होती.स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.यावेळी प्रशाला मुख्या.सौ.विशाखा चव्हाण,पदविधर राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शिवराज सावंत,सहाय्यक शिक्षिका सौ.मनिषा ठाकुर व सौ.अमृता राणे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेचे परीक्षण सौ.अंजना दत्तप्रसाद सामंत व सौ.राधिका शशिकांत मोरजकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.शिवराज सावंत सर यांनी केले.दांडी शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सौ.निर्झरा नरेश जोशी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.