Home स्टोरी दांडी आणि चिवला बीचवर सापडलेले ते “अंबरग्रीस, नसून पॉली ऍनाईल क्लोराईड पदार्थ!...

दांडी आणि चिवला बीचवर सापडलेले ते “अंबरग्रीस, नसून पॉली ऍनाईल क्लोराईड पदार्थ! पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती

137

 

मालवण: शहरातील दांडी आणि चिवला बीच या समुद्र किनाऱ्यावर काल बुधवारी पिठाच्या गोळ्यासारखे पदार्थ मच्छिमारांना आढळून आल्याने किनारपट्टी भागात खळबळ उडाली असतानाच या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत त्या पदार्थांची पाहणी केली. समुद्र किनाऱ्यावर आढळलेला हा पदार्थ देवमाशाची उलटी सदृश्य पदार्थ असल्याची आवई उठली गेल्यानंतर पोलिसांनी नेमका हा पदार्थ कोणता असावा याची खातरजमा करण्यासाठी बी. डी. एस व फॉरेन्सिक पथकाला पाचारण केल्यानंतर पथकाने दिलेल्या प्राथमिक अहवालात किनाऱ्यावर आढळून आलेल्या पदार्थात काही संशयास्पद आढळून न आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

 

दरम्यान , किनाऱ्यावर सापडलेला हा पदार्थ बोटीच्या कामात सिलिंगसाठी वापरला जाणारा पॉली ऍनाईल क्लोराईड हा पदार्थ असल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होत असल्याची माहिती मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली असून हा पदार्थ पुढील तपासणीसाठी कोल्हापूर येथे न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे

किनारपट्टीवर अशा प्रकारच्या वस्तू सापडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. कोल्हे यांनी केले आहे.