२८ ऑगस्ट वार्ता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीचा पुरवणी निकाल जाहीर केला आहे. दहावी आणि बारावीमध्ये नापास झालेल्या किंवा ज्यांना आपल्या गुणांमध्ये सुधारणा करायची असेल त्यांच्यासाठी हि परीक्षा घेण्यात येते. जुलै महिन्यात ही पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती.
या वर्षी बारावीच्या पुरवणी पेपरला ७० हजार २०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ६८ हजार ९०९ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार १४४ विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये सायन्समधील १४ हजार ६३२, आर्ट्समधील ४ हजार १४ आणि कॉमर्समधील ३ हजार २८, व्यावसायिक अभ्यासक्रमातील २८६ आणि आयटीआयच्या ५२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://mahresult.nic.in/