Home शिक्षण दहावीच्या परीक्षेत ९३.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण!

दहावीच्या परीक्षेत ९३.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण!

131

महाराष्ट्र बोर्डाकडून २०२२ -२०२३ च्या दहावी परीक्षेचा विभागनिहाय निकाल सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला आहे. राज्यातून एकूण १५,७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये ८४ हजार ४१६ मुले असून ७३ हजार ६२ मुली आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ९३.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जास्तच जास्त शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विध्यार्थ्यांचे “महाराष्ट्र न्यूज नेटवर्क” च्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.