Home स्टोरी दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक!

दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक!

194

जम्मू: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीर पोलिसांनी ट्वीट करत या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागमधील अनंदवन संगम भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. तसेच काश्मीर पोलीस आणि लष्कराचे जवान या भागात सातत्याने कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.