सावंतवाडी: एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते शिक्षक बांधवांचा स्नेह मेळावा उद्या रविवार दिनांक १८ जून रोजी सकाळी अकरा वाजता कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित केला आहे. शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कार्यतत्पर असणाऱ्या एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या वतीने सातत्याने नवनवीन उपक्रम हाती घेऊन शिक्षकांचे उद्बोधन व प्रबोधन केले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एस. आर. दळवी फाऊंउंडेशनच्या सर्व शिक्षक बांधवांचा स्नेह मेळावा रविवारी आयोजित केला असून या मेळाव्यास फाऊंडेशनचे संस्थापक श्री. रामचंद्र उर्फ आबा दळवी व श्रीमती सीता दळवी यादेखील उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या पदाधिकारी बांधवांनी सदर स्नेह मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या टीम सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.