Home स्टोरी दर्पण प्रबोधिनीच्या वतीने २६ रोजी संविधान जागो अभियानांतर्गत व्याख्यान!

दर्पण प्रबोधिनीच्या वतीने २६ रोजी संविधान जागो अभियानांतर्गत व्याख्यान!

180

मसुरे प्रतिनिधी:

 

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान जागो अभियानांतर्गत दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्ग (रजि.) यांच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता

शिवश्री अॅड. रोशन पाटील यांचे जाहीर व्याख्यान उत्कर्षा हॉल, कणकवली एस.टी. स्टॅण्डसमोर आयोजित करण्यात आले आहे.

व्याख्यान साठी “भारतीय संविधानाचे महत्त्व व वर्तमान लोकशाहीची परिस्थिती” हा विषय असून सत्यशोधक युवा समाज प्रबोधनकार व शिवराज्य संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष शिवश्री अॅड. रोशन पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थितीचे आवाहन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग च्या वतीने अध्यक्ष आनंद तांबे, उपाध्यक्ष नरेंद्र तांबे / प्रज्ञा कदम, सचिव सुभाष कदम,सह सचिव संदेश कदम, खजिनदार विशाल कासले यांनी केले आहे.