Home स्टोरी दत्ताराम सातू सावंत यांच्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ या स्व -लिखित विज्ञान पुस्तिकेचे...

दत्ताराम सातू सावंत यांच्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ या स्व -लिखित विज्ञान पुस्तिकेचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन 

167

सावंतवाडी: बालकांना आवडेल आणि त्यांना सहज समजून येईल, अशा पद्धतीच्या विज्ञानातील प्रयोगांची सोपी मांडणी आदर्श प्राथमिक शिक्षक दत्ताराम सावंत यांनी आपल्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ या पुस्तकात मांडली आहे. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना या पुस्तकाचे अध्ययन केल्यावर भावी संशोधक व्हावे म्हणून गोडी निर्माण होईल, अशा पद्धतीने या पुस्तकाची मांडणी आहे. म्हणून अशाच पद्धतीचे विज्ञान शिक्षण मनोरंजनातून विद्यार्थ्यांना दिल्यास त्यांच्या संशोधनवृत्तीत वाढ झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान केले.

 

 

 

जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार प्राप्त, सरमळे शितप शाळा येथील प्राथमिक शिक्षक दत्ताराम सातू सावंत यांच्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ या स्व -लिखित विज्ञान पुस्तिकेचे प्रकाशन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते  करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समिती सदस्य भरत गावडे, कवी विठ्ठल कदम, प्रा. रुपेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, गणेशप्रसाद गवस, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समिती सदस्य प्रा. सुषमा मांजरेकर व लेखक दत्ताराम सावंत आदि उपस्थित होते.

 

 

 

 

दरम्यान दत्ताराम सावंत यांच्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ पुस्तकात विज्ञानावर आधारित 14 प्रयोग समाविष्ट केले आहेत. स्वतः शिक्षक सावंत यांनी तब्बल वीस वर्षे विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरापर्यंत मजल मारली असून त्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून विविध पारितोषिके मिळविले आहेत. विज्ञानाचे एक प्रयोगशील शिक्षक म्हणून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि राज्यात परिचित आहेत. विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने प्रयोग कसे करता यावेत, यासाठी मनोरंजनातून विज्ञान शिकविण्यात दत्ताराम सावंत यांची ख्याती आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. या पुस्तकाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच सावंतवाडी पंचायत समितीचे सदस्य व युवा नेते संदीप गावडे यांनी शुभेच्छा दिल्या असून प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच राज्यस्तरावर काम करणारे विविध विज्ञान शिक्षक यांनी देखील शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत. दत्ताराम सावंत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याबद्दल त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.