मसुरे प्रतिनिधी: आंगणेवाडीच्या या पुण्यभूमीत आजचा हा माझा सत्कार हा मी श्रीदेवी भराडी मातेचा प्रसाद समजतो आणि या पुण्यभूमीत श्रीदेवी भराडी माता रंगमंचावरती माझ्या आज वरच्या पत्रकारितेतील कार्याचा आणि आदर्श जिल्हा पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल तुम्ही केलेला गौरव हा इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा किंवा सत्कारापेक्षा मोठा आहे. असे मी समजतो. आंगणे कुटुंबाने आज जो माझ्यावरती विश्वास दाखविला आहे याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. या परिवाराचा मी सदैव ऋणी राहीन आणि यापुढेही माझ्या पत्रकारितेतील सेवा प्रामाणिकपणे देण्याचा मी प्रयत्न करेन. असे प्रतिपादन आंगणेवाडी येथे बोलतांना पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी रुदय सत्कारास उत्तर देताना केले..
आंगणेवाडी येथे श्रीदेवी भराडी माता रंगमंचावरती पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना आदर्श जिल्हा ग्रामीण पत्रकार पुरस्कार तसेच पत्रकारितेतील आजवरच्या सेवेचा गौरव म्हणून आंगणेवाडी नाट्य मंडळाचे ज्येष्ठ नाट्य कलाकार अर्जुन उर्फ काका आंगणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. यावेळी भास्कर आंगणे, छोटू आंगणे, आंगणेवाडी मंडळाचे कार्यवाहक बाळा आंगणे, गजानन आंगणे, बाबू आंगणे, आत्माराम आंगणे, सुशील आंगणे,शशिकांत कांबळी, झुंजार पेडणेकर,अनंत आंगणे, बाब्या आंगणे,मधुकर आंगणे,संकेत आंगणे, आबा आंगणे,समीर आंगणे, सचिन आंगणे, संतोष आंगणे, दीपक आंगणे,नंदू आंगणे, सुधा आंगणे,विद्या आंगणे,प्रसाद आंगणे,रघुनाथ आंगणे,शशी आंगणे,दिनेश आंगणे,सतीश आंगणे, तनुराज आंगणे, राजन आंगणे, सीताराम आंगणे, आनंद आंगणे,भरत आंगणे,रामदास आंगणे,विजय आंगणे,गणेश आंगणे,पंकज आंगणे आणि आंगणे ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी पत्रकार झुंजार पेडणेकर याना तालुका पत्रकार समितीचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच ज्येष्ठ रंग करणे शरद कांबळी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन आंगणे आणि प्रास्ताविक बाळा आंगणे यांनी केले. यावेळी काका आंगणे,छोटू आंगणे यांनी शुभेच्छा दिल्यात.
फोटो: पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा आम्ही कुटुंबीयांच्या वतीने आंगणेवाडी येथे सन्मान करताना काका आंगणे आणि छोटूआंगणे, बाळा आंगणे आणि मान्यवर…
छाया: अनंत आंगणे, आंगणेवाडी.