मसुरे प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचा इयत्ता सहावी मधील विध्यार्थी दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर याने बिडीएस परीक्षेत गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याला शंभर पैकी ९१ गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या यशा बद्दल संस्था व प्रशालेच्या वतीने अध्यक्ष न. ना. पंतवालावलकर, उपाध्यक्ष विलास मुणगेकर, सुरेश बांदेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, मुख्याध्यापिका एम बी कुंज यांनी अभिनंदन केले आहे.