मसुरे प्रतिनिधी : मसुरे मेढा वाडी येथील रहिवासी आणि निवृत्त पोस्टमन, साईभक्त रमेश वसंत मसुरकर वय 82 यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. बंडू पोस्टमन या टोपण नावाने आणि थोर साईभक्त म्हणून त्यांची गावामध्ये ओळख होती. गावामध्ये सामाजिक, कला, क्रीडा, धार्मिक, क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. डाक विभागामध्ये पोस्टमन या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. गावामध्ये सर्वांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. गावातील अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्था मध्ये त्यांनी अनेक पदे भूषवली होती. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, भावजय, पुतणे, पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार असून युवा सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार उर्फ नंदू आणि वसंत यांचे ते वडील तर विनोद मसुरकर यांचे ते काका होतं.







