Home Uncategorized त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरूपिठामध्ये २३ जुलैपासून याज्ञिकी प्रशिक्षणाचे आयोजन

त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरूपिठामध्ये २३ जुलैपासून याज्ञिकी प्रशिक्षणाचे आयोजन

181

१५ जुलै, नाशिक, वार्ता : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरुपीठामध्ये दि. 23 जुलै ते 29 जुलै या काळात 7 दिवसीय निवासी याज्ञिकी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागप्रमुख श्री. नितीनभाऊ मोरे यांनी दिली.
गुरुपुत्र श्री. मोेरे यांनी सांगितले की, सेवामार्गाने नेहमी जनहित आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्या हेतूनेच सेवामार्गातर्फे बहुविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. सेवेकर्‍यांनाही ‘याज्ञिकी’ म्हणून सेवा करता यावी या उद्देशाने परमपूज्य गुरुमाऊलींच्या आज्ञेने याज्ञिकी प्रशिक्षण घेतले जात आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाणार असून सहभागी होणार्‍या सेवेकर्‍यांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. सात दिवस संपूर्ण दिवसभर प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाणार आहे. जुलै महिन्याचा मासिक महासत्संग शनिवार दि 22 जुलै रोजी होणार आहे. मासिक सत्संगाच्या दुसर्‍या दिवसापासून याज्ञिकी प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. त्याकरिता https://bit.ly/3PPntEO या लिंकवर जाऊन सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. या प्रशिक्षणांतर्गत अखंड नामजप सप्ताहाचे प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे. सेवामार्गातर्फे दत्तजयंती आणि स्वामी पुण्यतिथी निमित्ताने वर्षभर दोन नाम जप सप्ताह घेण्यात येतात. त्यावेळी सेवाकेंद्रांमध्ये याज्ञिकींची कमतरता भासते. सहा हजाराहून अधिक सेवाकेंद्रे आहेत. त्यामुळे याज्ञिकींची संख्या वाढावी, सेवेकरी याज्ञिकी बनावेत या भूमिकेतून परमपूज्य गुरुमाऊलींच्या आज्ञेने याज्ञिकी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे अशी सविस्तर माहिती श्री. नितीनभाऊ मोरे यांनी दिली आहे
सेवामार्गात जे याज्ञिकी आहेत आणि याज्ञिकी होण्याची ज्यांची इच्छा आहे अशा सर्वांनी या प्रशिक्षणात सहभागी व्हावे असे श्री. मोरे यांनी स्पष्ट केले. इच्छुकांनी आपल्या सोबत श्रीगुरुचरित्र ग्रंथ, श्रीदुर्गा सप्तशती, श्रीस्वामीचरित्र सारामृत ग्रंथ, श्रीविष्णुसहस्त्रनाम पोथी, गीताई, मनाचे श्लोक, नित्यसेवा ग्रंथ, जपमाळ, पळी, पेला, ताम्हण, आसन, गंध, अक्षता,हळद-कुंकू, यज्ञविधी ग्रंथ आदी साहित्य आणावयाचे आहे.
श्रीस्वामी सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवाप्रबोधन विभागातर्फे नरसोबा वाडी, जळगांव येथेही दर महिन्याच्या दुसर्‍या रविवारी गर्भसंस्कार, शिशूसंस्कार, बालसंस्कार, प्रश्नोत्तरे, वास्तूशास्त्र आदी विषयांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात येते.