नाशिक १५ मे वार्ता: उरुसानंतर १३/ मे/ २०२३ रोजी रात्री दहाच्या सुमारास काही मुस्लिमांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात उत्तर द्वारातून घुसण्याचा प्रयत्न केला. या मुस्लिमांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसून महादेवाच्या पिंडीवर चादर चढवायचा अट्टाहास धरला. यावेळी त्याठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्या मुस्लिमांना वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळला. त्यानंतर या घटनेबाबत श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक च्या वतीने संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक च्या वतीने दिलेली तक्रार पुढीलप्रमाणे आहे.
उपरोक्त विषयान्वये आपणास विनंती पूर्वक कळविण्यात येते की, दि. १३/०५/२०२३ रोजी रात्री सुमारे ०९:४१ मिनिटांच्या दरम्यान श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वार येथे स्थानिक संदल निमित्त निघालेल्या मिरवणूकीतील काही इतर धर्मिय व्यक्तींनी उत्तर महाद्वार येथून श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न वजा हट्ट केला असता सदर ठिकाणी नियुक्त असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांनी सदर व्यक्तींना मज्जाव करुन त्यांना आडवले. वास्तविक श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घटने प्रमाणे दर्शनाचे अधिकार हे हिंदु धर्मातील व्यक्तींना देण्यात आलेले आहे. वरील झालेल्या प्रकारमुळे सामाजिक सलोख्यास तेढ निर्माण होण्याचे प्रयत्न होत असल्याचे आम्ही सदर पत्राद्वारे आपल्या निर्दशनास आणून देऊ इच्छितो. तरी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मा. विश्वस्त मंडळाच्या सुचनान्वये मी आपणास विनंती करतो की, आपण कृपया झालेल्या प्रकरणाचा योग्य तो तपास करुन संबंधीतांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी, ही विनंती.तरी सामाजिक सलोखा व शांतता राखण्याची जाबाबदारी आपली असल्याने हा तक्रार अर्ज आपणाकडे विनंती पूर्वक सादर.
आपला विश्वासू, प्रशासकीय अधिकारी, श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक.