सावंतवाडी: सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून दर वर्षी त्रिपुरा पोर्णिमे दिवशी शहरातील सर्व मंदिरात पणत्या लाऊन मंदिर परिसर दीपोत्सव साजरा केला जातो. याही वर्षी दीपोत्सव साजरा करायचा आहे.तर चला मग उद्या रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी त्रिपुरा पौर्णिमा आहे त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये संध्याकाळी ठीक सात नंतर प्रत्यक् मंदिरात पणत्या लाऊन दीपोत्सव होणार आहे. हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील महिला भगिनींनी पाच तरी पणत्या आपल्या जवळच्या मंदिरामध्ये लावून दीपोत्सवा मध्ये सहभागी व्हावे. गेल्या वर्षी मोठ्या दिमाखात दीपोत्सवामध्ये महिना भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दर्शवला होता तसेच विविध संघटना तसे मंदिराच्या व्यवस्थापक प्रमुखांनी सुद्धा भाग घेऊन शहरातील सर्व मंदिरे एक दीप लावून उजळून निघाले होते. यंदाही पुन्हा अशाच प्रकारे दीपोत्सव साजरा करूया. दीपोत्सवामध्ये शहरातील महिला भगिनी तसेच नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.
Home स्टोरी त्रिपुरा पोर्णिमा निमित्ताने शहरातील सर्व मंदिरे प्रकाशम करूया :- माजी नगराध्यक्ष बबन...