Home स्टोरी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त असंख्य स्वामी भक्त पालखी सोबत स्वामींच्या दर्शन भेटीस !

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त असंख्य स्वामी भक्त पालखी सोबत स्वामींच्या दर्शन भेटीस !

85

मसुरे प्रतिनिधी: 

 

रविवार दिनांक २६/११/२०२३ रोजी दुपारी ०३:५३ ते सोमवार दिनांक २७/११/२०२३ रोजी दुपारी ०२: ४५ या वेळेत त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने व दिनांक २७/११/२०२३ रोजी गुरुनानक जयंतीची शासकीय सुट्टी असल्यामुळे अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरीता स्वामी भक्तांची खुपच गर्दी होणार असून स्वामी भक्तांच्या या वाढत्या गर्दीमुळे सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता दिनांक २६/११/२०२३ व दिनांक २७/११/२०२३ अखेर मंदिरात स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. स्वामी भक्तांनी अभिषेकाची पावती केल्यास स्वामींंचा खडीसाखर व अंगारा प्रसाद मिळेल.

पौर्णिमेनिमित्त स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांकरीता मंदिर समितीच्या वतीने विशेष दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रसंगी स्वामी भक्तांना टप्प्याटप्प्यानेही दर्शनास सोडण्यात येईल. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुणे, दौंड, मालेगांव, मसले चौधरी, बार्शी सोलापुर, कर्जत, भोर, खर्डी-पंढरपूर, कुमठा सोलापुर इत्यादी ठिकाणांहुन दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणारया सर्व स्वामी भक्तांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील भक्त निवास भोजन कक्ष येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे, तरी परगावाहून दिंडी व पालखी सोबत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा, सेवेचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व मा.नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.