Home स्टोरी त्रिंबक येथे मेरी मिट्टी मेरा देश अभियानाचा समारोप!

त्रिंबक येथे मेरी मिट्टी मेरा देश अभियानाचा समारोप!

102

 

 

मसुरे प्रतिनिधी:

 

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायत त्रिंबक मार्फत मेरी मिट्टी मेरा देश अभियानाचा समारोप विविध उपक्रमांनी करण्यात आला.

सकाळी शालांत परीक्षेत जनता विद्या मंदीर त्रिंबक प्रशालेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कुमार मनोहर घाडीगावकर याचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले. तदनंतर त्रिंबक ग्रामपंचायत सरपंच श्री. किशोर त्रिंबककर यांचे हस्ते शिला फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच उपस्थित ग्रामस्थांनी पेटत्या पणत्या हातात घेऊन पंचप्राण शपथ घेतली. ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात माजी स्वातंत्र सैनिक कुटुंबीय, सेवानिवृत्त सैनिक, पोलिस यांचा माननीय सरपंच श्री. किशोर त्रिंबककर, उपसरपंच श्री . आशिष बागवे व इतर मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करणेत आला. जनता विद्या मंदीर प्रशाला आवारात उपास्थित मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सदर कार्यक्रमास सरपंच श्री.किशोर त्रिंबककर,उपसरपंच श्री. आशिष बागवे, मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. अशोक बागवे, ग्रामसेविका सौ माधुरी कामतेकर सह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केद्रप्रमुख श्री. प्रसाद चिंदरकर यांनी केले.