Home राजकारण तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार पंचायत समिती निवडणुकित उमेदवार उतरवणार..

तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार पंचायत समिती निवडणुकित उमेदवार उतरवणार..

302

वेंगुर्ला (तुळस):  तुळस ग्रामपंचायत मधून अपक्ष म्हणून निवडून आलेले सदस्य नारायण कुंभार आता पंचायत समिती निवडणुकीसाठी आपला उमेदवार उतरवणार आहेत. अशी माहिती त्यांनी आज जाहीर केली आहे. तुळस ग्रामपंचायत निवडणुकीत नारायण कुंभार यांनी अपक्ष उमेदवारी लढवत भाजपच्या तिन्ही उमेदवारांना पराभूत करत विजय मिळवला होता. मिळवलेल्या विजयानंतर नारायण कुंभार यांचे राजकीय वजन तुळस गावात लक्षणीयरीत्या वाढल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. नारायण कुंभार एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. त्यांना शालेयजीवनापासूनच समाजकार्य  लोकसेवा यामध्ये रुची आहे. नारायण कुंभार तुळस गाव आणि गावाच्या जवळच्या इतर गावातील लोकांच्या सर्व प्रकारच्या मदतीला सर्वतोपरी सदैव तत्पर असतात. गावातील गरजू लोकांसाठी मेडिकल कॅम्प, शैक्षणिक कॅम्प, नेत्र तपासणी कॅम्प राबवण्याचे काम नारायण कुंभार यांनी आजवर अनेक वेळा केले आहे. त्याप्रमाणे गावातील लोकांच्या विविध समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवणे आणि त्या समस्या सोडवणे यासाठी नारायण कुंभार नेहमी सक्रिय असतात. त्यामुळे नारायण कुंभार यांची तुळस गाव आणि  वेंगुर्ला तालुक्यातील एक तरुण कर्तृत्वान नेतृत्व अशी ओळख आहे. त्यांच्या गरजू व्यक्तींना सहकार्य कारण्याच्या या स्वभावामुळे सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग सह जिल्ह्यात मोठा मित्रपरिवार आहे. नारायण कुंभार यांच्या याच समाजसेवी स्वभावामुळे आता त्यांनी पंचायत समिती निवडणुकिच्या रिंगणात उतरावे अशी अनेकांची इच्छा आहे.

मात्र नारायण कुंभार यांनी अद्याप उमेदवारचे नाव जाहीर केले नाही. तुळस ग्रामपंचायत ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी गावची जनता ठामपणे उभी राहील. अशी सर्वत्र चर्चा सर्वत्र सुरु आहे. गावाच्या विकासासाठी नारायण कुंभार यांनी पंचायत समिती निवडणुकित सक्रिय भाग घ्यावा. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे