वेंगुर्ला: तुळस गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी जैतीर सोसायटी चे चेयरमन संतोष शेटकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवड बद्दल त्यांचे मित्रपरिवाराकडून अभिनंदन होत आहे आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गावच्या सरपंच सौ. रश्मी परब यांनी श्री संतोष शेटकर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच सचिन नाईक, ग्रामविकास अधिकारी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार, जयवंत तुळसकर, रमाकांत ठूबरे, विनिता शेटकर, स्वाती राऊळ, चरित्रा परब आणि तुळस ग्रामस्थ आदी उपस्थित होते.