कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): खारघर मुत्युकांडात मृत्युमुखी पडलेले सर्वजण ओबीसी समाजाचे आहेत, तुम्हालाही बाबासाहेब भेटले नसते तर तुम्हीही बैठकीत जावून बसला असता, बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्विकारुन या देशात खरी समाज क्रांती केली आहे,असे परखड विचार व्याख्याने आणि आमदार अमोल मिटकरी यांनी कल्याण पूर्वेतीत एका व्याख्यानात केले .कल्याण पूर्वेतील संबोधी प्रबोधन मंच या सेवा भावी संस्थेच्या विद्यमाने श्री मलंग रोड वरील १०० फुटी रोडवर महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या समयी आमदार अमोल मिटकरी यांनी तब्बल २ तासांच्या व्याख्यानात हिंदूत्ववादावर वरखड विचार व्यक्त करीत समाज प्रबोधन केले.खारघर प्रकरणावर टीका करतांना त्यांनी सांगितले की, त्या घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्व ओबीसी समाजाचे होते, मृत कुटुंबियांना सरकारने ५ लाख रुपये जाहिर केले आहेत मरणाराचे मरण इतके स्वस्त झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी उपस्थित समाज बांधवांना उद्देशून सांगितले की बरे झाले तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर भेटले, नाहीतर तुम्हीही आज बैठकीत दिसला असता. डोक्यावर टोपी घालून मी ….. आहे असे सांगणारे मानवाच्याच्या मुळ उत्क्रांतीचा डार्विनच्या सिद्धांताला मुठमाती देवून पुन्हा मनुवादी प्रणाली या देशाच्या शिक्षणावर लादण्याचा डाव आखत जात आहे, हा डाव तमाम ओबीसी समाजाने उलथून टाकला पाहिजे, कारण ओबीसी समाजाचे उद्धार कर्ते फक्त आणि फक्त फुले – शाहू – आंबेडकरच आहे या महामानवाचे विचार गाडून पून्हा मनुवाद लादला जाण्याचे शडयंत्र रचले जात आहे हे भविष्यातील भारतीय लोकशाहीला अत्यंत घातक आहे, भारतीय लोक एकत्र नव्हते म्हणून ब्रिटीशांनी या देशावर दिडशे वर्ष राज्य केले आता पुन्हा लोकशाही वाचवण्यासाठी सर्व समाज घटकांनी एकत्र आले पाहिजे असेही ते म्हणाले. संबोधी प्रबोधन मंच यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संयुक्त जयंती उत्सवाच्या विचार मंचकावर उद्योगपती अमित सोनवणे, समाजसेवक सुबोध भारत, देवचंद अंबादे, प्रभाग ५ ड चे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील, भाजपा पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, प्रबोधन मंचचे अध्यक्ष महावीर डोंगरे, कार्याध्यक्ष अमित बनसोडे तसेच जगदीश गायकवाड, रविंद्र लोहकरे आदी मान्यवर उपस्थित होते.व्याख्याना पूर्वी विकास सोनवणे प्रस्तुक ‘सुर्योदय क्रांतीचा ‘ हा बुद्ध – भिम गितांवर आधारीत गायक राजू सर्वे आणि त्यांच्या टिमने गित – संगिताचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे प्रबोधनात्मक मनोरंजन केले.कार्यक्रमास बौद्ध उपासक – उपासिका आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.