Home स्टोरी तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी श्री.हनुमंत पेडणेकर यांची निवड!

तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी श्री.हनुमंत पेडणेकर यांची निवड!

137

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांची रविवार दिनांक २५ जुन २०२३ रोजी मळेवाड “राजगड रिसॉर्ट” येथे जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री. प्रेमानंद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेसाठी तालुक्यातील ४२ सरपंच व ११ उपसरपंच उपस्थित होते, नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांना जिल्हाध्यक्ष श्री. देसाई, तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद गावडे, जिल्हा संघटक श्री. सुरेश गावडे, तांबोळी गावचे माजी सरपंच श्री. अभिलाष देसाई यांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांना मार्गदर्शन करताना संघटनेचे महत्त्व समजावून सांगितले, सरपंच म्हणून काम करताना संघटनेची नितांत गरज आहे, गेल्या पाच वर्षात संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न, समस्या तालुका, जिल्हा ते राज्य शासन दरबारीपर्यंत पोचवण्याची व सोडवण्याचेही काम संघटनेच्या माध्यमातून केले गेले, CRZ, आपले सेवा सरकार, डाटा ऑपरेटर मानधन, स्ट्रिट लाईट वीज बील, वन्यजीव प्राण्यांपासून होणारी शेती नुकसानी व मिळणारी तुटपुंजी भरपाई, अश्या अनेक विषयांवर संघटित झाल्याने सरपंच म्हणून आपल्या गावातील बाजू प्रभावीपणे मांडता