Home स्टोरी तहसीलदार हे जनतेचे सेवक आहेत कीं खाणमालकांचें ? माजी आ. परशुराम उपरकर

तहसीलदार हे जनतेचे सेवक आहेत कीं खाणमालकांचें ? माजी आ. परशुराम उपरकर

118

सावंतवाडी प्रतिनिधी: सर्वसामान्य जनता आपली कामे कधी होतील? या विवंचनेत तर विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशाकरिता दाखले कधी मिळतील? या आशेवर असताना सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या केबिन मंध्ये तसेच तहसीलदार आवारात सोमवारी चक्क खाण, कॉरी, गौण खनीज मालकांनी गर्दी केली होती. यामुळे नागरिकांची कामे सोडाच त्यांना दिवसभर ताटकळत उभे राहावे लागले. अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. त्यामुळे तहसीलदार हे जनतेचे सेवक आहेत कीं खाणमालकांचें? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या केबिन मंध्ये सोमवारी तसेच तहसीलदार यांच्या आवारात चक्क खाण, कॉरी, गौण खनिज मालकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. आठवड्याचा पहिला वार असताना त्यात कोकण पदवीधर निवडणुक, न्यायालयीनं वं दैनंदिन कामकाजाची गडबड रोजची असल्याचे पहायला मिळत असताना सोमवारी मात्र वेगळे चित्र होते. तहसीलदार पाटील यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर खाण मालकांनी गर्दी केली होती. पावसाळा हंगाम सुरु आहे अशात खाणी, कॉरी बंद असताना देखील खाण मालकांचें काम काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. नागरिकांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांचे लक्ष वेधले असता त्यांनी कार्यालयात जाऊन पाहणी केली. खाण मालक तहसीलदार यांच्या केबिन मंध्ये तर सर्व सामान्य नागरिक तासनतास ताटकळत बाहेर उभे असे दिसून आले त्यामुळे तहसीलदार पाटील यांना खाण मालकांचा इतका पुळका कां असा सवाल सुभेदार यांनी उपस्थित केला. तहसील कार्यालयात लोकांची कामे वेळेत होत नाहीत. विद्यार्थी यांना शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले तत्परतेने दिले जातं नाहीत. त्यात मराठा समाजाला लागणारे दाखले देण्यास तहसीलदार यांनी नकारात्मक भूमिका घेतली एवढ्या सगळ्या समस्या उद्भवत असताना तहसीलदार श्रीधर पाटील खाण मालकांच्या इतके जवळ का. ते त्यांना आपल्या केबिन मंध्ये बसवून एवढे कोणते महत्वाचे काम करतं होते यांचे उत्तर त्यांनी दयावे. या सर्व घटनेवरून तहसीलदार पाटील यांना सर्वसामान्य जनते पेक्षा कॉरी, क्रशर खाण मालक जास्त प्रिय आहेत असे दिसते. तर तहसीलदार यांच्या केबिन मंध्ये व तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये खाण मालक यांच्या सेवेसाठी नायब तहसीलदार, मंडळ अधिकांरी ही उपस्थित होते त्यांचे एवढे लाड कशासाठी, बहुतांशी अनधिकृत कॉरी क्रशर खाणी यांच्यावर कारवाई करायचे सोडून नेमके तहसीलदार कोणत्या चर्चेत त्या व्यावसायिकांसोबत गुंतले होते? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी उपस्थित केला आहे.