शिवसैनिकांनी आक्रमक होत रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे! १५ दिवसात ठेकेदाराकडून पावसाळी डांबराने खड्डे बुजविण्याचे काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा….
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: एन.एच. १६६ राष्ट्रीय महामार्ग तळेरे- वैभववाडी- गगनबावडा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. नागरिक, प्रवाशी, वाहनचालक यांना खड्डयांतून प्रवास करावा लागत असून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. शिवसेनेने राज्य सरकारकडे रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करून देखील गेली तीन वर्षे हा रस्ता नादुरुस्त ठेवण्यात आला. त्यामुळे अनेक अपघात या रस्त्यावर घडत आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना नेते सतीश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत वैभववाडी येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक होत रस्त्यावरील खड्ड्यात झाडे देखील लावली. दरम्यान पोलिसांनी विनंती केल्याने काही काळाने हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले.
एन.एच. १६६ राष्ट्रीय महामार्ग तळेरे- वैभववाडी- गगनबावडा या रस्त्यावर पडलेले खड्डे माती आणि खडी टाकून बुजविले जात होते शिवसैनिकांनी तात्काळ हे काम थांबवले. आणि आज रस्तारोको आंदोलनावेळी चांगल्या प्रतीचे पावसाळी डांबर व पेव्हर ब्लॉक बसवून हे खड्डे बुजवावेत अशी सूचना आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव व उपअभियंता अतुल शिवनीवार यांना दिल्या. लक्ष्मीकांत जाधव यांनी या रस्त्याची पाहणी करण्याची ग्वाही दिली.या रस्त्यासाठी निधी मंजूर आहे.वर्कऑर्डर देखील झाली आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदाराने काम सुरू करण्यात दिरंगाई केली आहे. त्यामुळे १५ दिवसात काम घेतलेल्या ठेकेदाराकडून प्रथमतः पावसाळी डांबर आणि पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्याचे काम करून घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी याप्रसंगी दिला.
आ. वैभव नाईक म्हणाले, चार वर्षांपूर्वी खासदार विनायक राऊत आणि मी स्वतः पाठपुरावा करून तळेरे- वैभववाडी- गगनबावडा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग केला. गतवर्षी या रस्त्यासाठी २ कोटी रु.मंजूर झाले होते. परंतु ते कमी पडणार असल्याने पुन्हा पाठपुरावा केल्याने आता १०० कोटी पेक्षा जास्त निधी या रस्त्यासाठी मंजूर झाला आहे. गेल्या मार्च महिन्यातील अधिवेशनात मी या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर विद्यमान बांधकाम मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले होते. त्यांनी देखील प्रयत्न केले आणि रस्त्याची फेब्रुवारी मध्ये वर्कऑर्डर काढण्यात आली. गेले ७ महिने काही लोकांच्या राजकीय हितसंबंधांमुळे आणि आपल्या ठेकेदाराला टेंडर मिळाले नाही म्हणून हे टेंडर रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. येथील लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या संगनमताने हे काम थांबवले जात आहे असा आरोप आ.वैभव नाईक यांनी केला. ४० टक्के कमी दराने हे काम घेऊन ठेकेदार देखील या कामात दिरंगाई करत आहे. त्यामुळे ठेकेदाराकडूनच खड्डे बुजविण्याचे काम करून घेणे क्रमप्राप्त आहे. ठेकेदार ऐकत नसेल तर त्याला ब्लॅकलिस्ट केले पाहिजे.यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, रामू विखाळे, युवासेना सचिव स्वप्नील धुरी, वैभववाडी शहरप्रमुख शिवाजी राणे,उपतालुका प्रमुख श्रीराम शिंगरे,सुरेश पांचाळ,सुनिल रावराणे,कोळपे सरपंच सुनिल कांबळे, लोरे सरपंच विलास नावले,माजी सभापती दिपक पांचाळ, धनंजय हेर्लेकर,बाबू तावडे, शंकर कोकरे, यशवंत गवाणकर,उपसरपंच खांबले गणेश पवार,बाबा मोरे, राजेश तावडे, जावेद पाटणकर, गौस पाटणकर, रोहीत पावसकर, समाधान काडगे, संदेश सुतार,सिद्धेश रावराणे, अनंत नांदलस्कर, जनार्दन विचारे, जाधव बुवा, श्रीकांत डाफळे, स्वप्नील रावराणे, सदानंद पाटिल, जयेश पवार, मंगेश सुद, अनिल नराम, देऊ मांजलकर, वाहतूक सेना प्रमुख बबन धुरी, मयूर दळवी, पांडू पांचाळ, दिपक पवार, सूर्यकांत परब, रियाज रमदुल, सलीम पाटणकर, आसिफ पन्हाकर, प्रकाश कोकरे, प्रवीण काडगे, धकटू जाधव, सुरेश चाळके, शुभाश चाळके, रमेश मांडवकर, रमेश साळुंखे आदी शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
