पुणे: १२ मे वार्ता: पुण्याच्या तळेगावमध्ये किशोर आवारे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. हल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. नगरपरिषद कार्यालासमोरच ही धक्कादायक घटना घडलेली आहे. कार्यालयातून बाहेर येताच, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर हल्ला केला. गोळीबार ही झाल्याचं बोललं जातं आहे. किशोर आवारे हे जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष होते. आवारे यांच्यावर नेमका कोणी आणि का हल्ला केला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.







