Home क्राईम डोक्यात मोज मारुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर सावंत यांची निर्दोष मुक्तता.

डोक्यात मोज मारुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर सावंत यांची निर्दोष मुक्तता.

57

सावंतवाड़ी प्रतिनिधी: सावंतवाड़ी तालुक्यातील साटेलो तर्फ साता धील गावामध्ये दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी आरोपी ज्ञानेश्वर गंगाराम सावंत यांने त्यांच्या गावातील जगन्नाथ याला मारहाण केली महणून नाईक कुंटूबीय आरोपीच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले. त्याचा राग येवुन आरोपी यांने ललिता नाईक हिच्या डोक्यात चिरे तासण्याची मोज मारुन खुनाचा प्रयत्न केला म्हणून आरोपी यांच्या विरुध्द सावंतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता, सदरची घटना हि दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पडलेली होती. सदर पटनेच्या पुर्वी १२.३० वाजता जगन्नाथ नाईक याला मारहाणीची पटना घडलेली होती. सदर घटनेनंतर फिर्यादी जगन्नाथ नाईक व त्यांचे कुंटूबिय जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेले असता सदरचा प्रकार घडला असे फिर्यादी यांच्या सांगण्यावरुन सदरची तक्रार ही नोंदविण्यात आलेली होती. त्यानंतर आरोपी यांस अटक करण्यात आली व आरोपी विरुध्द दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते, व सदर केसचे कामकाज जिल्हा न्यायालय सिधुदुर्ग येथे सुरु करण्यात आले होते.

 

सदर केसमध्ये दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर सदर केसची सुनावणी हि दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी पासुन सुरु करण्यात आलेली होती. सदर केसमध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण १२ साक्षीदार तपासण्यात आलेले होते. सरकार पक्षाच्यावतीने सदर केस शाबीत करण्याच्या दृष्टीने सरकार पक्षाचा मुख्य साक्षीदार जगन्नाथ, ललिता, रघुनाथ, रुचिका, गावातील प्रमोद नाईक असे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासण्यात आले होते. तसेच वैदयकिय पुरावा याकरिता डॉ. पी. डी. वजराटकर तर सदर केसचा तपास करणारे तपासिक अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक तौफिक अब्दुल सम्पद्व व अन्य साक्षीदार यांची साक्ष सदरकामी नोंदविण्यात आलेली होती.

 

सदरकामी सरकार पक्षाने तपासलेले साक्षीदार यांची उलटतपासादरम्यान स्वप्नील कोलगांवकर यांनी घेतलेली उलटतपासणी यामध्ये सरकार पक्षाचे साक्षीदार यांनी सरकार पक्षाची दिलेली साक्ष सत्यतेच्या पलिकडे आहे. हि नावं संशय निर्माण करणारी ठरली. त्यामध्ये साक्षीदार यांनी दिलेली साक्ष यामध्ये तक्रारदार जगन्नाथने दुसरी घटना दुपारी १ वाजता घडते व घटने दरम्यान जख्मी झालेली जख्मी ललिता हिला सांवतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दुपारी १ वाजताच तिच्यावर उपचार करण्यात येतात. ही बाब मे. कोर्टासमारे उलटतपासादरम्यान व युक्तीवादा दरम्यान दाखवुन देण्यात आली. त्यामुळे ही घटना १ वाजता घडली की त्यामध्ये काही गोष्ट्री लपविण्याचा प्रयत्न तरी करत नाही ना. याबाबत संशय निर्माण मे. न्यायालयासमोर उलटपासामध्ये व युक्तीवादी दरम्यान करण्यात आला.

 

मे. कोटासमोर सरकार पक्षाच्यावतीने जो युक्तीवाद मांडण्यात आला त्यामध्ये आरोपी याला अशास स्वरुपाच्या गुन्हा मध्ये याआधी शिक्षा झालेली आहे. त्यामुळे तो शिक्षेस अगर आरोपी यांने गुन्हा कसा केला? यावर भर देण्यात आला व मे. कोर्टाकडेच आरोपीला जास्तीत जास्त शिक्षेची मागणी करण्यात आली. याउलट आरोपीच्या वतीने युक्तीवाद करताना अॅड. स्वप्नील कोलगांवकर यांनी सरकार पक्षाने आरोपी हेतू, त्याचा उद्देश, त्यामागची त्याची तयारी काय होती?  हि बाब मे. कोर्टासमोर आणलेली नाही. आरोपी यांचा गुन्हात कसा सहभाग नाही? याबाबत जे जप्त करण्यात आलेले हत्यार त्यावर रक्ताचे डाग नाही. हे संशयास्पद दिसुन येते. तसेच ललिता हिच्या अंगावर असणारे कपडे याला रक्त आहे. असा एकही साक्षीदार सांगत नाही. तसेच साक्षीदार रघुनाथ सकाळी ७ वाजता आपल्या सासरवाडीला काही करणास्तव जातो व तो ११ वाजता येतो आणि उलटतपासामध्ये विचारलेल्यानंतर तो आपण ९ वाजता गावातील मंदिरातच होतो. असे सांगतो त्यामुळे सदर साक्षीदार कसा खोटे बोलतो? हि बाब कोर्टासमोर आणली. तसेच साक्षीदार रुचिका हि नोकरी करते आणि घटने दरम्यान ती घटना पाहते व ती कशाप्रकारे आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून कोर्टाकडे कशी चुकिची साक्ष देते. ही बाब दाखविण्यात आली. तसेच गावातील साक्षीदार प्रमोद नाईक हा प्रत्यक्ष घटना पाहतच नाही व खोट वक्तव्य करतो. ही बाब देखील दाखविण्यात आली. तसेच अशा वेगवेगळया मुदयावर युक्तीवाद करण्यात आला. तसेच तपासीक अंमलदार यांनी मे. कोर्टासमोर सत्य आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. तसेच सरकार पक्ष हा केवळ केस कशी शाबीत करता येईल. यादृष्टीने तपासकामातील उणिवा कशा भरुन काढता येतील व गुन्हा कशाप्रकारे शाबीत करण्याचा अशक्य प्रयत्न करत आहे असा युक्तीवाद केला.

 

सदरकामी सरकार पक्षाने तपासलेले साक्षीदार व आरोपीच्या वतीने घेण्यात आलेला उलटतपास व करण्यात आलेला युक्तीवाद यातुन संशय मे. न्यायालयासमोर निर्माण झाला व सरकार पक्ष संशयाच्या पलिकडे जावुन केस शाबीत करु न शकल्यामुळे आरोपी ज्ञानेश्वर गंगाराम सावंत याची सबळ पुराव्या अभावी मे. जिल्हा न्यायालयाचे सत्र न्यायाधीश यांनी मुक्तता केलेली आहे. याकामी सदर आरोपी यांच्या वतीने अॅड. स्वप्नील बबन कोलगांकवर, अॅड. संकेत अभय नेवगी तसेच अॅड. दत्तप्रसाद गजानन नाटेकर यांनी काम पाहीले.